कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी मा. आ. नारायण (आबा) पाटील यांचा वाढदिवस आपआपल्या गावी रक्तदान वा वृक्षारोपण या सामाजिक उपक्रमांनी साजरा करावा, असे आवाहन पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले आहे. याबाबत सविस्तर माहिती देताना त्यांनी सांगितले की दर वर्षी प्रमाणे दि 23 ऑगस्ट रोजी माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांचा वाढदिवस असुन करमाळा मतदार संघातील कार्यकर्त्यांनी आपापल्या गावी तो सामाजिक उपक्रम आयोजित करुन साजरा करावा. वृक्षारोपण व रक्तदान शिबीर यापैकी जो शक्य असेल तो उपक्रम कोरोना निर्बंधाचे पालन करत आयोजित करण्यात यावा असे त्यांनी म्हटले आहे.
करमाळा तालूक्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने जेऊर ता. करमाळा येथे होणारा जाहिर सत्कार समारंभ रद्द करण्यात येत आहे. यामुळे माजी आमदार नारायण पाटील यांना भेटुन प्रत्यक्ष शुभेच्छा देण्याचे कार्यकर्ते व शुभचिंतकांनी यंदाच्या वर्षी टाळावे. आपल्या प्रेम, विश्वास व शुभेच्छांचा पाटील गट नेहमीच आदर करत असुन यावर्षी मात्र कोरोना निर्बंध पाळण्याची सामाजिक जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. कार्यकर्त्यांनी आपापल्या गावी शक्य असल्यास वृक्षारोपण करावे व सदर वृक्षांचे वाढीपर्यंत संगोपनासाठी योग्य ते नियोजनही करावे. कोरोना सारख्या गंभीर महामारीस तोंड देत आरोग्ययंत्रणा अहोरात्र झटत असल्याने आपल्या गावातील कोविड योध्दयांचा मानसन्मान या दिवशी करुन सामाजिक ऋण उतरण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा.
कुठेही गर्दी होईल असे इतर कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत यासाठी कार्यकर्त्यांनी दक्षता घ्यावी.सत्कार समारंभाचा अनावश्यक खर्च टाळून तो सामाजिक उपक्रमासाठी उपयोगात आणावा,असे आवाहनही सुनील तळेकर यांनी अधिकृतपणे केले आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.