loader
Breaking News
Breaking News
Foto

करमाळा महावितरण च्या सक्तीच्या वसुली कडे आजी ,माजी लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष का ? संजय (बापु) घोलप यांचा सवाल?

करमाळा महावितरण च्या सक्तीच्या वसुली कडे आजी ,माजी लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष का ?असा सवाल महाराष्ट्रा नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संजय बापु घोलप यांनी केला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

याबाबत अधीक बोलताना घोलप म्हणाले की आपण ज्याच्या समस्या सोडवण्यासाठी जनतेने आपल्याला निवडुन देतात ते आज करोना काळात होरपळून निघत असताना पाऊस नाही वीजेचे बील तरं भरावेच लागते पण त्या वर व्याज पण भरावे लागते आज जर कुठलीही कल्पना न देता महावितरण ने वीज कनेक्शन तोडले तरं जी उडीद आज हाताला आलेला तो पण जाईल मग कशाच्या जीवावर पैसे भरणार मग जमिनी विकून पैसे भरावे किंवा मरावे ऐवढाच पर्याय शेतकऱ्यांपुढे उरतो निवडणुका आले कि शेतकऱ्यांकडून बोलणारे त्याच्या विषयी कळवळा दाखवणारे लोकप्रतिनिधीं कुठे दिसुन येत नाहीत तसेच व्यापारी वर्ग पण कठीण परिस्थितीतून जात आहे बँकेचे व्याज वीज बील व कसलाही टॅक्स नगरपालिकेतील घरपट्टी कशातही सवलत मिळाली नाही ते असताना दुकाने दोन तीन तासांसाठी उघडण्याची परवानगी मिळाली होती ती पण आता पुन्हा बंद करण्याचे आदेश मा.जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळाले आहेत पोलिस रस्त्यावर दुकान उघडले कि दंड फाडताता मग एक बाजुने सर्व बंद करायचे आणी दुसर्याबाजुने वीजेची सक्तीची वसुली करायची हा प्रकार काय? असे देखील त्यांनी म्हटले आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

आता शेतकऱ्यांनी व व्यापारांनी जगावे का मरावे अशी परिस्थितीतून जात आहे ऐन निवडणुकीच्या वेळेस आपल्या दारात येणाऱ्या आपले आजी माजी लोकप्रतिनिधी जर आपल्या संकट काळात येत नसतील तरं शेतकऱ्यांनी व व्यापारांनी त्यांना निवडणुकीत दारात उभे करू नका आपण आपल्या समस्या सोडवण्यासाठी ह्या लोकप्रतिनिधीं असतात पण बघुन अधंळ आणि ऐकुन बहिरे हे होत असतील तरं त्याची जागा आपण त्यांना दाखवलीच पाहिजे .आजच्या अडचणीच्या परिस्थितीत आजी माजी लोकप्रतिनिधीं जर शेतकऱ्यांच्या व व्यापाराच्या बाजुने उभा राहत नसतील तरं मला फक्त ऐवढंच म्हणायचं आहे कि " झोपलेल्या माणसांला जागं करता येते पण झोपेचे सोंग करणाऱ्याला जागे करता येत नाही" शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेना,करमाळा आपल्यासाठी कायम बरोबर असुन आपण जनतेच्या जोरावर आपण लढु असे मत मनसे तालुका अध्यक्ष मा.संजय (बापु) घोलप यांनी पत्रकार यांच्या शी बोलताना व्यक्त केले व तालिबानी वृत्तीच्या महावितरण च्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांवर व व्यापारांवर होणारा त्रास व सक्तीची वसुली कधीही सहन करणार नाही हे प्रशासनाने लक्षात ठेवावे.या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे . जि.उपाध्यक्ष राजेंद्र मोरे,ता उपाध्यक्ष, अशोक गोफणे,ता.उपाध्यक्ष मा.राजाभाऊ बागल ,शहर अध्यक्ष नानासाहेब मोरे, जि.म.न.वि से संपर्क अध्यक्ष मा. विजय रोकडे, करमाळा ता.संपर्क अध्यक्ष मा.रामभाऊ जगताप, म.न.वि.से.जि.अध्यक्ष मा.सतिश फंड,जि.उपाध्यक्ष म.न.वि.से मा.आनंद मोरे ,शहर अध्यक्ष म.न.वि.से मा.तेजस राठोड ,शहर अध्यक्ष उद्योजक आघाडी मा.अरीफ पठाण, शहर उपाध्यक्ष मा.रोहित फुटाणे,शहर उपाध्यक्ष मा.अजिंक्य कांबळे,शहर उपाध्यक्ष मा.सचिन कणसे,किरण,कांबळे,सो.जि.म.न.वि.से प्रसिद्धी प्रमुख मा.महेश डोके मा.अनिल माने योगेश काळे,अमोल जांभळे,राजा कुभांर, विजय हजारे,योगेश काळे,स्वप्निल कवडे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts