loader
Breaking News
Breaking News
Foto

विकास कामांच्या पाठपुराव्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट- माजी आमदार नारायण पाटील यांची माहिती

शिवसेना पक्षात सध्या पदाधिकारी बदल तसेच अंतर्गत गटबाजीचे वारे वाहत आहे.त्यातच नारायण पाटील यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्याच्या बातम्या पसरल्या होत्या या अनुषंगानेच नारायण पाटील यांनी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीने त्याबाबत अंदाज व्यक्त केले जात होते तसेच आमदार संजय शिंदे यांच्या कारखान्यातील बोगस कर्ज प्रकरण मुद्द्यावरून आवाज उटवणारे संजय कोकाटे हे देखील उपस्थित असल्याने या प्रकणाची देखील या भेटीला झालर लागली होती ,मात्र माजी आमदार नारायण पाटील यांनी या चर्चा फेटाळून लावल्या असुन फक्त विकास कामांसाठीच हि भेट घेतली असल्याचा खुलासा माजी आमदार नारायण पाटील यांनी करमाळा चौफेर शी बोलताना केला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या वेळी अधीक बोलताना पाटील म्हणाले की दि 18 ऑगस्ट रोजी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच ऊर्जामंत्री नितीन राऊत व शिवसेना नेते अनिल देसाई यांच्या भेटी घेतल्या असुन व करमाळा माढा मतदार संघातील विविध विकासकामांसाठी निधीची मागणी केली आहे.याबाबत सविस्तर माहिती देताना नारायण पाटील यांनी सांगितले की मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे आपण मुख्यमंत्री विशेष निधी अंतर्गत काही रस्त्यांसाठी निधी मागितला आहे. यात कुगाव-जेऊर-साडे-सालसे या रस्त्यासाठी 25 कोटी रुपये, पांडे-शेलगाव-साडे-घोटी-केम या रस्त्यासाठी 5 कोटी, बोरगाव-करंजे-मिरगव्हाण-कोळगाव-निमगाव-गौंडरे रस्त्यासाठी 3 कोटी 50लक्ष तसेचरावगाव-वीट-पोफळज-केडगाव रस्ता 5 कोटी, पारेवाडी-राजुरी-विहाळ-अंजनडोह-कोंढेज-मलवडी-केम या रस्त्यासाठी 2 कोटी 50 लक्ष, केतुर2-केतूर 1- वाशिंबे-सोगाव-राजूरी-सावडी 2 कोटी, कंदर-केम-रोपळे-मुंगशी रस्त्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणी केली असुन या सर्व रस्त्यांची दुरुस्ती होणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री यांचेसमोर मांडले असल्याचे सांगीतले आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

तर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना निवेदन देऊन आवाटी येथे नवीन 33/11 केव्ही सबस्टेशन निर्माण केले जावे हि मागणी केली आहे. यामुळे आवाटी, नेरले, गौंडरे, निमगाव, कोळगाव, हिसरे, हिवरे, फिसरे, सालसे आदि गावातील कमी दाबाने व खंडीत पुरवठा होणारी वीज समस्या दुर होईल व शेतीसाठी पुर्ण दाबाने अखंडीत वीज देता येईल. तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना करमाळा येथे ट्रामा केअर हाॅस्पिटल मंजूर करुन त्याचे निर्माण करावे अशी मागणी केली आहे. यामुळे करमाळा तालुक्यातील आरोग्यसेवा आणखी सुधारली जाणार आहे. या सर्व कामांच्या पुर्ततेसाठी आपला पाठपुरावा सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

माजी आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समोर करमाळा मतदार संघातील वीज, दळणवळण, आरोग्य याविषयी महत्त्वाचे प्रश्न मांडले असुन याबाबत चर्चा केली आहे. मुख्यमंत्री यांचेसह ऊर्जामंत्री व आरोग्यमंत्री यांचीही भेट घेऊन केवळ प्रलंबित आणि प्रस्तावित विकासकामांसाठी नीधीची मागणी केली आहे.शिवसेना सचिव तथा राज्यसभा सदस्य अनिल देसाई यांचेकडे खासदार फंडातून काही विविध कामांसाठी निधी मिळावा म्हणून मागणी केली आहे.यामुळे हि भेट केवळ आणि केवळ विकासकामांसाठीच होती अशी माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी दिली. तसेच 2014 ते 2019 मधील मतदार संघातील प्रस्तावित कामांचा पाठपुरावा मा. आ. नारायण पाटील हे नियमितपणे करत असल्याचे सांगण्यात आले.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts