loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या वतिने महिलांच्या सुरक्षिततेसाठी सायबर अलर्ट अभियान - युवती अध्यक्ष शितल क्षीरसागर यांची माहिती

सोशेल मिडियावर बनावट आयडी तयार करून महिलांचे फेसबुक व्हाट्सप हॅक करुन महिला युवतींची बदनामी केली जाते.तसेच ब्लॅकमेल करून गैरप्रकार केला जातो या प्रकारात वाढ होत असल्याने महिलांची सुरक्षिताता धोक्यात आली आहे विशेष म्हणजे गुन्हे दाखल करुन देखील हे गुन्हेगार पोलीसांच्या तावडीत सापडत नसल्याने ते सोकावत आहेत. मध्यंतरी पांडे ता करमाळा येथे देखील आसा प्रकार घडला असून एका माथेफिरुने गावातील मुली विवाहित महिलांचे फोटो एडिट करून फेसबुकवर व्हायरल केल्याने खळबळ माजली होती नंतर अकाउंट डिलीट केल्याने तपास होवु शकला नाही.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

असे प्रकार झाल्यानंतर महिला व मुलींचे मानसिक खच्चीकरण होत आहे.अशा महिलांना संरक्षण व आधार देण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या माध्यमातून सायबर अलर्ट हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.आशी माहिती राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या तालुकाध्यक्षा शितल क्षीरसागर यांनी दिली.या विषयी अधिक माहिती देताना त्यांनी सांगीतले की अशा प्रकरणात गुन्हा दाखल करण्या पासुन ते तपास लागेपर्यंत महिलांना पाठबळ दिले जाणार आहे.खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनातुन व आमदार संजयमामा शिंदे यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम सुरु करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

पोलीस स्टेशन च्या वतिने या उपक्रमास सहकार्य मिळावे या करता राष्ट्रवादी युवतीं काँग्रेस च्या वतिने निवेदन देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले.पोलीस स्टेशन च्या वतीने सदर निवेदन स्विकारले असुन असा गुन्हा झाल्यास तर सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे अश्वासन युवतीं च्या शिष्टमंडळास दिले आहे. या वेळी करमाळा तालुका राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस तालुका अध्यक्षा शितल क्षिरसागर .कार्य अध्यक्षा स्नेहल अवचर .सरचिटणीस संस्कृती बागल उपस्थित होत्या .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

असे प्रकार घडल्यास महिलांनी राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस च्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधन्याचे आवाहन करण्यात आले आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts