loader
Breaking News
Breaking News
Foto

आधाराची गरज असलेल्या अपंगासाठी कोंढेज ग्रामपंचायतची मदत निश्चितच महत्वपूर्ण ठरेल - सुनिल तळेकर

आधाराची गरज असलेल्या अपंगासाठी कोंढेज ग्रामपंचायतची मदत निश्चितच महत्वपूर्ण ठरेल असे प्रतिपादन पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी केले आहे. कोंढेज ग्रामपंचायतीच्या वतीने अपंग व्यक्तींना आर्थिक मदत करण्यात आली असून मदतीचे धनादेश अपंग व्यक्तींच्या घरी जाऊन देण्यात आले.यावेळी माजी आमदार नारायण (आबा) पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी या कामाचे कौतूक करताना सांगितले की कोरोनाच्या कठीण कालावधीत ग्रामीण भागातील आर्थिक कणा मोडकळीस आला असून ग्रामपंचायतीच्या वतीने अपंग व्यक्तींना घरी जाऊन आर्थिक मदत करणे हि बाब कौतुकास्पद असून अनूकरणीय आहे असे ही तळेकर यांनी सांगीतले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

कोंढेज गाव समृध्द करत असताना समाजातील आधाराची गरज असलेल्या अपंगासाठी होणारी हि मदत निश्चितच उपयोगी पडणारी आहे. गावाचा विकास करताना केवळ नागरी सुविधांचा विचार न करता उपेक्षित समाज, अपंग, महिला व निराधार यांनाही गावगाड्यात बरोबर घेऊन जाण्याची जबाबदारी कोंढेज ग्रामपंचायत पार पाडत असुन त्यांचे पाठीमागे माजी आमदार नारायण (आबा) पाटील भक्कमपणे उभे असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.तर आज गावातील लाभस पात्र अपंग व्यक्तींसाठी ग्रामनिधीतुन एकुण आठ हजार शंभर रुपये देण्यात आले. यात संजीवनी महालिंग सालसकर, गणेश पांडुरंग करे, दादासाहेब भागवत लोंढे, जयसिंग वसंत इंगवले, दिपक संजय बोराटे, सुरेश महादेव करे, समाधान पंडीत लोंढे, औंदुबर गणपतराव गोंडगिरे, विजय नामदेव शेलार यांचा समावेश असल्याची माहिती उपसरपंच शहाजी राऊत यांनी दिली.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

तर ग्रामपंचायतीच्या वतीने अपंगासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषद,समाज कल्याण विभाग आदि माध्यमातून विविध योजनांतील मदत मिळवून देणार असल्याचे सरपंच छाया राऊत यांनी सांगितले.यावेळी ग्रा प सदस्य गोविंद लोंढे,अश्विनी सवासे, दाळुबाई बादल, सारीका आदलिंग, गणेश सालसकर,निवास महामुनी, निलेश राऊत, आदि उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

घरोघरी जाऊन अपंग बांधवाना मदत निधी उपलब्ध करून दिल्याने अपंग बांधव त्यांच्या कुटुंबीयांनी कौतुक केले आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts