राज्यात करोनाचा प्रकोप सुरू झाल्यापासून बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील दोन वर्षांपासून सरकारी नोकर भरतीवर अप्रत्यक्ष बंदीच सरकारने आणलेली आहे. त्यामुळेच स्वप्नील लोणकर व इतर होतकरू तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यातील स्पर्धा परीक्षार्थी खूप नैराश्यात असून, अजूनतरी सरकार कडून म्हणाव्या तश्या उपाययोजना केल्या गेलेल्या नाहीत. महाराष्ट्रातील तमाम तरुणांच्या मागण्यांचे निवेदन आज महेश घरबुडे व शर्मीली येवले यांच्या वतीने राज्यपाल यांना देण्यात आले.
घररबुडे हे मुळचे मिरग्व्हाण तालुका करमाळा येथील असून उच्च शिक्षणासाठी पुणे येथे स्थायिक आहेत आज त्यांनी व त्यांच्या सहकारी शर्मीला येवले यांनी राज्यपाल महोदय भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन खालील मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.
1) एमपीएससीच्या गट-क, कृषी सेवा, आणि वन सेवा या २०२० च्या जाहिराती २०२१ संपायला आले तरीही आलेल्या नाहीत, या पदभरती तत्काळ जाहीर करण्यात याव्या. 2) फेब्रुवारी २०२१ ला झालेली आरोग्य भरती आणि इतर सरळसेवा परीक्षांमध्ये, खासगी कंपन्याद्वारा होत असलेला भ्रष्टाचार थांबविण्यासाठी यापुढील गट-क आणि गट-ड पदांच्या सर्व परीक्षा MPSC व्दारे घेण्यात याव्या. 3) मागील दोन वर्षात कारोनाचे थैमान असताना स्पर्धा परीक्षा होऊ शकलेल्या नाहीत आणि नवीन जाहिरातीही आलेल्या नाहीत त्यामुळे कित्येक विद्यार्थी वय संपल्यामूळे एज बार झालेले आहेत, म्हणून सरसकट सगळ्या परीक्षांच्या वय मर्यादेत दोन वर्षाची सूट जाहीर करावी. 4) MPSC चे वेळापत्रक UPSC प्रमाणे एक वर्षाआधी जाहीर करण्यात यावे. 5) एमपीएससीचे काही सदस्य येणाऱ्या काळात निवृत्त होत आहेत, त्यांची निवड प्रक्रिया आताच सुरू करावी. 6) एमपीएससीवर कार्याचा भार बघता एमपीएससीची एकूण सदस्य संख्या १५ ते २० पर्यंत वाढविण्यात यावी. 7) रखडलेले निकाल लवकरात लवकर लावावेत 8) पोलीस भरती प्रक्रिया प्रत्येक वर्षी राबविण्यात यावी 9) दोन वर्षांपासून रखडलेली शिक्षकपद भरती लवकरात लवकर राबवावी 10) शालीय आणि महाविद्यालयीन फी कपात 15 % कपात करण्यात यावी 11) पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी धनगर NT-C व वंजारी NT -D या समाज्यातील विध्यार्थ्यांना पोलीस उपनिरीक्षक यापदासाठी जागा वाढून मिळव्यात. 2020 साली जाहीर झालेल्या जाहिरातीत धनगर समाजाला 2 जागा व वंजारी समाजाला एक ही जागा मिळाली नाही हा या विध्यार्थ्यांवर अन्याय आहे. तरी आपण लक्ष्य घालावे आशी मागणी केली आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.