करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा या महाविद्यालयांचा NCC विभागाचा सन 2020 21 वर्षाचा B प्रमाणपत्र व C प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल 100 % लागला . 9 महाराष्ट्र बटालियन यांच्या मार्फत घेतलेल्या एनसीसी प्रमाणपत्र B व C परीक्षा सन 2020 21 मधील वर्षाचा यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा एनसीसी विभागाचा जिल्ह्यात 10O % निकाल लागून प्रथम आलेला आहे.
9 महाराष्ट्र बटालियनचे ट्रेनिंग जेसीओ संजय गवी , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी . पाटील , बीएचएम बापू टेकनर व हवलदार प्रविण ढोरे यांच्या हस्ते एनसीसी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहांमध्ये वितरण करण्यात आले . सदर कार्यक्रमांमध्ये श्री संजय गवी यांनी विद्यार्थ्यांना एनडीएमध्ये जाण्यासाठी C प्रमाणपत्र चे महत्त्व सांगितले .
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. पाटील यांनी विद्यार्थ्यांना आर्मी तसेच इतर ठिकाणी भरती कसे व्हावे याचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये आर्मीत भरती झालेल्या श्री गणेश हाके यांचा सन्मान करण्यात आला. तसेच एसयूओ अभिजीत कुटे यांने इयत्ता बारावी विज्ञान शाखेत 96 % गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम व एनसीसी B प्रमाणपत्र परीक्षेत एक ग्रँड मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचा सन्मान करण्यात आला. सदर एनसीसी प्रमाणपत्र परीक्षेचा जिल्ह्यात 10O % निकाल लागल्याबद्दल संस्थेचे सचिव विलासरावजी घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, 9 महाराष्ट्र बटालियनचे सीओ कर्नल प्रशांत नायर, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी यांनी महाविद्यालयातील एनसीसी विभागाचे व एनसीसी मधील यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले .
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.