loader
Breaking News
Breaking News
Foto

कोरोना थैमान घालत असताना मतदार संघात पाय सुध्दा न ठेवणाऱ्या आमदारांनी लसिचे राजकारण करु नये उपसभापती पै दत्तात्रय सरडे यांचा आ.संजयमामा शिंदे यांना टोला !

कोरोना थैमान घालत असताना मतदार संघात पाय सुध्दा न ठेवणाऱ्या आमदारांनी लसिचे राजकारण करु नये असा उपरोधिक टोला उपसभापती पै दत्तात्रय सरडे यांनी आमदार संजयमामा शिंदे यांना लगावला असुन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई चा इशारा दिला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

लसीकरण मोहीमेत राजकारण करण्याचा आमदार संजय शिंदे यांचा प्रयत्न केविलवाणा असुन नागरिकांना वेठीस धरणारा असा आहे. वैद्यकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा जर अशा अहितकारी प्रयत्नात सहभाग अथवा हात आढळून आल्यास करमाळा पंचायत समिती कडून कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशारा उपसभापती दत्तात्रय सरडे यांनी दिला आहे. कोविडच्या कारणास्तव देशभरात लसीकरण मोहीम राबवली जात असताना करमाळा तालूक्यात मात्र यावरुन राजकारण केले जात असल्याची चर्चा आहे. याबाबत आज उपसभापती दत्तात्रय सरडे यांनी आमदार संजय शिंदे यांच्यावर आरोप करत आपली आक्रमक भुमिका जाहीर केली. याबाबत बोलताना सरडे म्हणाले कि आरोग्य विभागाकडून करमाळा तालुक्यातील विविध ठिकाणी नागरिकांना लस दिली जात आहे. केंद्रसरकारने सर्वांसाठी मोफत लस दिली असल्याने नागरिक नोंदणी करुन लस प्राप्त करुन घेत आहेत. परंतु आमदार संजय शिंदे मात्र लसीकरण केंद्रावर स्वतःचे बॅनर लावून कार्यकर्त्यांच्या मार्फत या योजनेत हस्तक्षेप करत आहेत.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

वाशिंबे सह अनेक ठिकाणी राजकीय आकसातून नागरिकांना लसीकरण केंद्रावरुन लस न देता हाकलून देण्याचे गंभीर प्रकार कानावर आले तर बहुतांश ठिकाणी लस घेण्याबाबतचे नोंदणीनंतरचे कुपन हे आमदार शिंदे समर्थक स्वतः आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांना वाटत होते. लसीकरण मोहिम हि राजकारण विरहीत राबवणे हि अधिकारी वर्गाची जबाबदारी असुन अधिकारी मात्र अनेक ठिकाणी राजकीय दबावाला बळी पडत आहेत. आमदार संजय शिंदे यांनी कोरोनाचा कहर उच्चपातळीवर थैमान घालत असताना मतदार संघात पाय सुध्दा ठेवला नाही. लसबाबत तुटवडा असताना लस मिळवण्यात आपण अपयशी ठरलो अशी कबुली याअगोदर दिली असताना आता मात्र खोटे श्रेय घेण्यासाठी धडपड करत आहेत. हा प्रकार लाजीरवाणा असुन करमाळा तालूक्याच्या राजकीय इतिहासात या अगोदर कधीच घडला नाही. जर नागरिकांना लस घेताना अडथळे येत असतील अथवा टाळले जात असेल तर आपण गप्प बसणार नसून करमाळा पंचायत समितीच्या वतीने दोषी अधिकारी व कर्मचारी यांचेवर कडक कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा उपसभापती दत्तात्रय सरडे यांनी दिला असून आपत्ती व्यवस्थापन समिती प्रमुख तहसिलदार यांनी या प्रकरणी वेळीच लक्ष घालून राजकीय हस्तक्षेप दुर करावा अशी मागणी केली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts