loader
Breaking News
Breaking News
Foto

करमाळा येथे कर्नाटक सरकारचा निषेध

करमाळा येथे सकल मराठा समाजाने केला कर्नाटक सरकारचा निषेध ! --------------------------------------- #करमाळा_चौफेर बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. मात्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात हटविला. या घटनेचा करमाळा तालुका सकल मराठा समाजाच्या वतिने तिव्र निषेध करण्यात आला करमाळा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकल मराठा समाज व शिवभक्तांनी एकत्र येत “कर्नाटक शासनाची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही” अशा निषेधाच्या घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर दणाणून सोडला. केंद्रात आणि कर्नाटकात भाजपचे सरकार आहे. तरी देखील त्या ठिकाणच्या प्रशासनाने पुतळा हटवण्याची हिमंत कशी केली? आसा सवाल करत ही गोष्ट वेळीच भाजप सरकारने रोखावी अन्यथा शिवभक्त शांत बसणार नाहीत आसा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला. या वेळी भाजपाच्या व कर्नाटकी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

शहर प्रतिनिधि

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

करमाळा येथे सकल मराठा समाज व शिवभक्तांच्या वतीने कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts