loader
Breaking News
Breaking News
Foto

शेलगाव क ची वाटचाल समृद्धीच्या दिशेने -तहसीलदार समीर माने

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील अनेक गावांनी वॉटर कप मध्ये उल्लेखनीय काम केलेले आहे. 2018 साली तालुक्यातील वॉटर कप स्पर्धेचा द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या शेलगाव क या गावाची वाटचाल समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून समृद्धीकडे चाललेली आहे. त्याबद्दल ग्रामस्थांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहेत असे प्रतिपादन करमाळा तालुक्याचे तहसीलदार समीर माने यांनी केले.शेलगाव येथील बापु माने यांच्या शेतामध्ये उभा केलेल्या गांडूळ बेडची पाहणी त्यांनी केली त्यावेळेस ते बोलत होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

2020 पासून पाणी फाउंडेशन ने समृद्ध गाव स्पर्धा सुरू केलेली आहे. या स्पर्धेच्या निकषानुसार पौश्टिक गवताची नर्सरी उभा करणे व त्याची लागवड करणे, वृक्षारोपण करणे व त्याचे संवर्धन करणे, हंगामनिहाय पिकांचे सर्वेक्षण करणे, वर्षातून तीन वेळेस विहिरीची पाणी पातळी मोजणे, पावसाच्या नोंदी पर्जन्यमापक द्वारे ठेवणे, शेतीसाठी आवश्यक असणारे कंपोस्ट , नाडेप, गांडूळ खत प्रकल्प उभा करणे, आदी कामे समृद्ध गाव स्पर्धेत अपेक्षित आहेत आणि ही कामे शेलगाव चे ग्रामस्थ अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करत आहे त्यामुळे या ग्रामस्थांचे कौतुक आहेच .भविष्यात प्रशासनातील जबाबदार घटक म्हणून ग्रामस्थांना जे जे सहकार्य लागेल ते ते सहकार्य करण्याची भूमिका आपण निश्चितच पार पाडू असे तहसीलदार समीर माने यांनी शेलगाव गाव भेटी प्रसंगी सांगितले.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

याप्रसंगी शेलगाव क चे कृषी सहाय्यक श्री खाडे , पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक प्रतिक गुरव, डॉ. विकास वीर, बापू माने, वैभव वीर, सचिन वीर, लखन ढावरे, सुनील वीर , अमोल पायघन, सुनील पायघन, सुनील माने आदी उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts