आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्या नावे महाराष्ट्रात ट्रि बॅंक सुरु करुन विट ता करमाळा येथील काका काकडे या युवकांने 4700 झाडे लावल्यांने या उपक्रमाची राज्यभर चर्चा होत आहे. श्रद्धा सामर्थ्यवान असते कोणावर तरी किंवा कशावर तरी श्रध्दा ठेवल्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही.त्याचीच प्रचिती विट ता करमाळा जि सोलापूर येथील दादाश्री फाउंडेशन चे काका काकडे यांच्या बाबतीत येत आहे.
द्रोणाचार्य एकलव्याला गुरु पाहिजे होते परंतु ते त्यांचे गुरु होऊ शकले नाहीत म्हणून तो खचला नाही त्यांनी त्यांचा पुतळा तयार करून ज्ञान आत्मसात केले अशीच काही परिस्थिती आपल्या करमाळा तालुक्यातील विट येथील दादाश्री फाउंडेशन च्या माध्यमातून समाजसेवा करणाऱ्या काकासाहेब काकडे यांची झाली आहे.महाराष्ट्रात देशाच्या राजकारणात दबदबा निर्माण करणारे खूप नेते होऊन गेले व आजमितीला ही आहेत.परंतु ह्या पट्ट्याला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांच्या विचाराने व कार्याने प्रभावित केले आहे.त्यांचे काम करण्याची पद्धत उच्च विचारसरणी व आभाळऐवढ उत्तुंग व्यक्तिमत्व असतानाही कसलाच गर्व नसलेला नेता म्हणून त्यांना ते आदर्शवत वाटतात.
काकडे यांचे अनेक महाराष्ट्रातील आमदारांशी थेट संबंध असताना ही त्यांना वाय एस जगन मोहन रेड्डी मनापासुन आवडतात. काकडे यांनी अनेक राज्यांचा प्रवास विमानाने रेल्वेने केलेला आहे ते विविध राज्यात गेल्यावर त्यांनी वाय एस जगन मोहन रेड्डी साहेब यांच्याविषयी मत विचारले असता सगळे खूप सकारात्मक दृष्टीने त्यांच्याविषयी बोलतात. कोणीही वाईट बोलत नाही मग काय तेव्हा पासुन सुरू झाला प्रवास, वाय एस जगमोहन रेड्डी साहेबांच्या विचारधारेचा .त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काकडे यांनी समाजकारण सुरू केले दादाश्री फाउंडेशन ची स्थापना केली .दादा म्हणजे मोठा भाऊ आणि करता माणूस तेव्हापासून त्यांनी वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्या विचारधारेत काम सुरू केले.कोरोना काळात अनेक रुग्णांना त्यांनी मास्क व सॅनीटायझर दिले. कित्येकांना मोफत बेड व ऑक्सीजन बेड ,रेमडिसिव्हर मिळवून दिले,कोरोना काळात करमाळा तालुक्यातील सर्व पोलिस बांधवांना दादाश्री फांऊडेशन मार्फत मोफत मास्क व सॅनीटाईझर किट वाटले. अनेक रक्तदान शिबिरे घेतली. त्यानंतर आंध्रप्रदेश सरकार म्हणजे वाय एस जगण मोहन रेडी साहेब यांनी महाराष्ट्र सरकारला 300 टन ऑक्सिजन दिल्यावर या पट्ट्याने विविध गावात पेढे वाटले होते व रेड्डी रेड्डी साहेब किती दर्यादिल माणूस आहेत हे पटवून दिले.पुढे जाऊन त्यांनी वाय एस जगन मोहन रेड्डी ट्री बँक खोलली त्यांनी आतापर्यंत स्वखर्चाने चार हजार 700 झाडे लावली आहेत त्यापैकी तीन हजार झाडे ही वाय एस जगन मोहन रेड्डी ट्रि बँकेच्या नावाखाली लावली आहेत व ती सर्व झाडे खूप चांगल्या पद्धतीने आली आहेत व ते जपत आहेत.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.