loader
Breaking News
Breaking News
Foto

आ संजयमामा शिंदे व युवा नेते रविंद्र वळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त निंभोरे येथे दोनशे जणांना लसीकरण

आ संजयमामा शिंदे व युवा नेते रविंद्र वळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त निंभोरे येथे कोविड प्रतिबंधक लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते या मध्ये दोनशे जणांना लसीकरण करण्यात आले दिनांक 30 जुलै 2021 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंभोरे येथे हा कार्यक्रम घेण्यात आला.यासाठी गावचे होतकरू तरुण आणि सामाजिक कार्यकर्ते राविभाऊ वळेकर यांनी प्रयत्न केले आणि लसीकरण सुरळीत पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

कोरोनाचा कहर पुन्हा एकदा वाढत असताना लसीकरण अत्यंत महत्वाचे आहे त्या दृष्टीने गावमध्येच लसीकरण शिबिर आयोजन करावे अशी गावातील नागरिकांची मागणी होती त्या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वळेकर यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लसीकरण शिबीर आणि वृक्षारोन करण्याचे ठरऊन चांगले सामाजिक काम पूर्ण केले.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

या लसीकरण शिबिरासाठी वैद्यकीय तज्ज्ञांनी उपस्थित राहून नागरिकांना लसीकरणाचे महत्व पटवून देऊन लसीकरणानंतर कोणताही त्रास होणार नाही असा विश्वास दिला. नागरिकांनी योग्य सामाजिक अंतर ठेवून लसीकरण शिबिरासाठी सहकार्य केले आणि आजचा कार्यक्रम यशस्वी झाला सदर कार्यक्रमासाठी जिल्हापरिषद प्राथमिक शाळा निभोरे आणि धर्मवीर संभाजी विद्यालय निंभोरे येथील सर्व सहशिक्षकांनी आणि आशा वर्कर यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच सुतार भाऊसाहेब, दिलीपराव मुळे,रामचंद्र घुटके,ज्ञानेश्वर वळेकर , नाथाभाऊ शिंदे, पोलीस पाटील पन्हाळकर, व आर. व्ही. ग्रुप चे पदाधिकारी यांनी सहकार्य केले.डॉ अभिजीत नवनाथ बागडे. डॉ निलेश कृष्णा कुबेर. डॉ शितल शांताराम घायल यांनी विशेष सहकार्य केले

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

आमदार संजयमामा शिंदे व युवा नेते रविंद्र वळेकर यांचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts