loader
Breaking News
Breaking News
Foto

फिसरे येथील तरुणाई धावली पुरग्रस्तांच्या मदतीला, ग्रामस्थांच्या सहकार्यातून शेकडो क्विंटल धान्य व जीवनावश्यक वस्तुंचे करणार वाटप!

फिसरे येथील तरुणाई पुरग्रस्तांच्या मदतीला धावलीअसुन ग्रामस्थांच्या सहकार्यातून शेकडो क्विंटल धान्य व जीवनावश्यक वस्तुंचे पूरग्रस्त भागात वाटप करण्यात येणार आहे. सरपंच उपसरपंच आजी माजी सदस्य सामाजिक मंडळाचे पदाधिकारी व सामान्य कुटुंबातील युवक नागरींकानी यात मह्त्वपूर्ण सहभाग नोंदवला आहे. करमाळा तालुक्यातील फिसरे सारख्या छोट्या गावाने मनाचा मोठेपना दाखवून केलेली हि मदत पुरग्रसतांसाठी मोलाची ठरणार असून करमाळा तालुक्यात फिसरे ग्रामस्थांचे कौतुक होत आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

कोकण, मुंबई उपनगर, चिपळूण सांगली या जिल्ह्य़ात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने आलेल्या महापुरामुळे या भागातील नागरिकांचे जगजीवन विस्कळीत झाले आहे.अनेक गोरगरीबांचे कुटुंब उध्वस्त झाले आहेत. पुरपरिस्थीती अटोक्यात आली आसली तरी अन्नधान्य, कपडे,तेल साबण, या वस्तुंचा प्रचंड तुठवडा आहे. सरकारी यंत्रणे बरोबर अनेक समाजसेवी संस्था व राजकीय पक्षांकडून मदत होत आहे व मदतीचे आवाहन केले जात आहे .दिड दोन हजार लोकसंख्या असलेल्या करमाळा तालुक्यातील फिसरे या गावातील तरुणांनी पुरग्रस्तांना मदत करण्याचा चंग बांधला आणी ग्रामस्थांना मदतीचे आवाहन केले . तरुणांच्या आवहानास ग्रामस्थांनी भरभरून साथ दिली असून जवळपास ११ क्विंटल गहु, १८५ किलो ज्वारी,१९५ किलो साखर, ५० किलो पोहे,२० किलो शेंगदाणे, ०१ क्विंटल तांदुळ,५० ब्लँकेट, ५० टाॅवेल, मॅगी, पारलेबिस्किट,खोबरेल तेल,कोलगेट, फरसाण, माचिस बाॅक्स,मिठ,इत्यादी जीवनावश्यक वस्तु मोठ्या प्रमाणात जमा केल्या आहेत.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

मदतीची इच्छा व मनात माणुसकी असेलतर ग्रामीण भागातुन देखील मोठ्या प्रमाणात मदत करता येते हेच या ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे,सरपंच, उपसरपंच सदस्य यांच्यासह सर्व सामान्य कुटुंबातील नागरिक व युवक यांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबवला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या आगोदर आलेल्या पुरावेळी करमाळा तालुक्यातील कंदर गावातील मच्छिमार यांनी स्वतःच्या होडीतुन अनेकांचा जिव वाचवला होता तर करमाळा शहरातील नागरीकांसह मराठा फोर्टर्स च्या ग्रुपने मोलाची मदत केली होती.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts