फिसरे येथील तरुणाई धावली पुरग्रस्तांच्या मदतीला धावली असून ग्रामस्थांच्या सहकार्यातून शेकडो क्विंटल धान्य व जीवनावश्यक वस्तुंचे पूरग्रस्त भागात वाटप करणार आहेत.
कोकण, मुंबई उपनगर, चिपळूण सांगली या जिल्ह्य़ात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने आलेल्या महापुरामुळे या भागातील नागरिकांचे जगजीवन विस्कळीत झाले आहे.अनेक गोरगरीबांचे कुटुंब उध्वस्त झाले आहेत. पुरपरिस्थीती अटोक्यात आली आसली तरी अन्नधान्य, कपडे,तेल साबण, या वस्तुंचा प्रचंड तुठवडा आहे. सरकारी यंत्रणे बरोबर अनेक समाजसेवी संस्था व राजकीय पक्षांकडून मदत होत आहे व मदतीचे आवाहन केले जात आहे .दिड दोन हजार लोकसंख्या असलेल्या करमाळा तालुक्यातील फिसरे या गावातील तरुणांनी पुरग्रस्तांना मदत करण्याचा चंग बांधला आणी ग्रामस्थांना मदतीचे आवाहन केले .
तरुणांच्या आवहानास ग्रामस्थांनी भरभरून साथ दिली असून जवळपास ११ क्विंटल गहु, १८५ किलो ज्वारी,१९५ किलो साखर, ५० किलो पोहे,२० किलो शेंगदाणे, ०१ क्विंटल तांदुळ,५० ब्लँकेट, ५० टाॅवेल, मॅगी, पारलेबिस्किट,खोबरेल तेल,कोलगेट, फरसाण, माचिस बाॅक्स,मिठ,इत्यादी जीवनावश्यक वस्तु मोठ्या प्रमाणात जमा केल्या आहेत. मदतीची इच्छा व मनात माणुसकी असेलतर ग्रामीण भागातुन देखील मोठ्या प्रमाणात मदत करता येते हेच या ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे,सरपंच, उपसरपंच सदस्य यांच्यासह सर्व सामान्य कुटुंबातील नागरिक व युवक यांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबवला आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.