loader
Breaking News
Breaking News
Foto

करमाळा तालुक्यात शिवसेनेचे स्वबळ वाढवणार शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचे प्रतिपादन

शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा एसटी स्टँड मध्ये 1000 मास्क चे चे वाटप करण्यात आले शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्यावतीने देण्यात येणाऱ्या मदतीच्या माहितीचे फलकाचे अनावरण शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपजिल्हाप्रमुख भरत भाऊ अवताडे माजी शहरप्रमुख संजय शीलवंत युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड उपजिल्हाप्रमुख मयुर यादव शिवसेना शाखाप्रमुख समीर परदेशी युवा सेना तालुका समन्वयक शंभुराजे फरतडे आदीजण उपस्थित होते

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यावेळी करमाळा एसटी डेपो मध्ये काम करणार सर्व कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक नाईंटी फाईव्ह मास्क चे वाटप करण्यात आले उपस्थित प्रवाशांनाही मास्क देण्यात आले.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

यावेळी बोलताना महेश चिवटे म्हणाले संपूर्ण देशात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सर्व महाराष्ट्र वासियांच्या गळ्यातील ताईत बनले आहे उद्धव ठाकरे यांचे काम तळागाळातील जनतेपर्यंत पोचली असून विरोधी पक्षातील नेते सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या कामाचे कौतुक करत आहेत त्यांचा विचार घराघरात पोचण्यासाठी काम करत असून संपूर्ण करमाळा तालुक्यात शिवसेनेचे स्वबळ वाढवण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक काम करत आहे यावेळी बोलताना शंभूराजे फरतडे यांनी ग्रामीण भागातील प्रत्येक गावात युवा सेनेची शाखा काढून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणार असल्याचे सांगितले

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या वेळी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts