loader
Breaking News
Breaking News
Foto

उप-मुख्यमंत्री अजितदादा पवार व आमदार संजय मामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मांगी येथे नेत्रचिकित्सा शिबिर संपन्न पाचशे जणांची तपासणी

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार यांच्या 22 जुलै रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त तसेच आ. संजयमामा शिंदे यांच्या 31 जुलै रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त मांगी येथे संजयमामा शिंदे मोटार वाहतूक संस्थेच्यावतीने डोळे तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मे वाटप शिबीर आज संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन करमाळा तालुक्याचे तहसीलदार समीर माने, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुनील सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर चे अध्यक्ष रवींद्र वळेकर, सामाजिक कार्यकर्ते श्रेनिकशेठ खाटेर , करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल डुकरे ,वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल कोळेकर यांच्या उपस्थित झाले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या शिबिरामध्ये तपासणीनंतर गरजू रुग्णांना चष्मे वाटप , डोळ्याचा ड्रॉप चे वाटप करण्यात आले. ज्या रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करायची आहे त्यांच्या नावाची नोंदणी करण्यात आली . रुग्णांच्या सर्व तपासण्या करून त्यांचे ऑपरेशन करण्यात येणार आहे. रुग्णांच्या ने आण करण्याची व्यवस्था संजय मामा शिंदे मोटार वाहतूक संस्थेकडून केली जाणार आहे. नेत्रचिकित्सा शिबिराचा लाभ तालुक्यातील 500 हून अधिक नागरिकांनी घेतला.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

वाढदिवसाच्या निमित्ताने नेत्रचिकित्सा शिबिर बरोबरच कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामसेवक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा वर्कर यांना कोवीड योद्धा म्हणून या वेळी गौरविण्यात आले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुजित तात्या बागल यांनी केले तर आभार डॉ. विकास वीर यांनी मानले. याप्रसंगी श्रेनिकशेठ खाटेर , तहसीलदार समीर माने यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष शितल शिरसागर , उपाध्यक्ष रूपाली अंधारे, वंदना ढेरे, पल्लवी रनस्रूगारे, कार्याध्यक्ष स्नेहल अवचर ,सचिव मनीषा झिंजाडे ,सरचिटणीस संस्कृती बागल यांनी परिश्रम घेतले

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts