loader
Breaking News
Breaking News
Foto

दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आ. संजय शिंदे यांच्या हस्ते सत्कार संपन्न.

करमाळा तालुक्यातील श्रीमती रामबाई सुराणा विद्यालय चिखलठाण येथील इयत्ता दहावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. आदित्य आगलावे 98.8 कु. सानिका मोरे 96 .46 अक्षय मराळ 95. 26 कृष्णा राऊत 93.60, युवराज राजेंद्र बारकुंड 93.20 कु. अमृता सरडे 92.40 कु. संध्यारानी मराळ 92% या गुणवंत विद्यार्थ्यांना आमदार शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा उपजिल्हा रुग्णालय साठी 25 कोटी, डिक्सळ पुलासाठी 55 कोटी ची तरतूद अर्थसंकल्पामध्ये करून घेतल्याबद्दल तसेच दहिगाव उपसा सिंचन योजनेची दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता 342 कोटी मिळवून दिल्याबद्दल सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मा.राजेंद्रकुमार बारकुंड यांनी आ. शिंदे यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने केला.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

तसेच गेल्या 15 वर्षापासून आमदार बबनदादा शिंदे व करमाळ्याचे विद्यमान आ. संजयमामा शिंदे हे दोघेही बंधू त्यांच्या साखर कारखान्याच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील उजनी धरणाच्या बॅक वॉटर मधील शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी घेऊन जात आहेत .या नदीकाठच्या लोकांचे सारे प्रपंच हे उसावर अवलंबून आहेत .त्यामुळे या भागातील शेतकरी आ.बबनदादा शिंदे व आ. संजयमामा शिंदे यांच्या पाठीमागे भविष्यातही भक्कमपणे उभा राहील असे मनोगत श्री राजेंद्र कुमार बारकुंड यांनी व्यक्त केले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या वेळी सर्व पदाधीकारी उपस्थित होते

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts