loader
Breaking News
Breaking News
Foto

गौंडरे येथील महादेव मांढरे यांच्या लघुपटास पुरस्कार

गौंडरे येथील चौथी पास महादेव मांढरे संघर्षातुन करत आहे सिनेसृष्टीत पदार्पण . -------------------------------------------------------------------- दिग्दर्शक, अभिनेता महादेव मांढरे यांच्या #लागण_कोरोनाची लघूचित्रपटाने घेतली आंतरराष्ट्रीय भरारी.! ---------------------------------------------------------------- #करमाळा_चौफेर (एक सामाजिक संदेश देणारा लघूचित्रपट) गोंडरे ता करमाळा जि सोलापूर, येथील रहीवाशी . महादेव सुभाष मांढरे. शिक्षण ४ थी पास. परिस्तिथी मध्यम वर्गीय पण बालपणापासून अभिनयाची आवड असलेले महादेव मांढरे यांनी #लागण_कोरोना ची या लघुपटाची निर्मीती करुन आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माता व अभिनेता म्हणून ओळख ओळख केली आहे. मांढरे यांच्या अलका फिल्म प्रस्तुत " लागण कोरोनाची" या लघूचित्रपटाची औरंगाबाद येथील रोशनी इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल, बिहार , पश्चिम बंगाल, आणि कोलकाता येथील आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवल मध्ये अधिकृत कार्यालयीन स्क्रीनींगसाठी निवड करण्यात आली आहे. औरंगाबाद येथील रोशनी इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये १८० पेक्षा अधिक तर बिहार राज्यातील नवादा आंतरराष्ट्रीय शाॅर्ट फिल्म फेस्टीवल मध्ये एकूण ९६० पेक्षा अधिक भारतातील व विदेशातून शॉर्ट फिल्म आल्या होत्या. महादेव मांढरे याच्या "लागण कोरोनाची" शॉर्ट फिल्मची यातून स्क्रीनींगसाठी निवड झाली आहे. तसेच पश्चिम बंगाल आणि कोलकाता मध्ये देखील या लघुपटाची स्क्रीनींग साठी निवड करण्यात आली आहे. लागण कोरोनाची हा लघूचित्रपट सध्याच्या कोरोना परिस्तिथी वर प्रकाश टाकणारा लघु चित्रपट असुन चित्रनात आपण घरी थंबले तर आपण सुरक्षित राहून, प्रशासनाला मदत होईल, तसेच आपल्या कुटूंबात कोरोनाची शिरकाव होणार नाही, आपण बाहेरून आल्यावर हात धुतले पाहिजे, बाहेर जातेवेळी मास्क वापरले पाहिजे, अश्या घडामोडीवर कटाक्षाने प्रकाश टाकण्यात निर्माते यशस्वी झाले आहेत. मांढरे हे बिकट परस्थितीतुन आलेले आहेत व सामाजिक भान जपणारे कलाकार आहेत , त्यांच्या कलेतून फडा, वेशीला बांधले तोरण, देव भक्त,असे सामाजिक संदेश देणारे आणखी काही लघु चित्रपटाची निमिर्ती करण्यात आली असुन या लघुपटांनी ही इतर फेटीव्हल मध्ये सहभाग नोंदवला आहे. या सर्व लघुपटाचे चित्रणा वेळी सुशिल मुथा , धर्मवीर संभाजी विद्यालय गौंडरे, शाळेतील शिक्षक हरिदास काळे सर, मुख्याध्यापक बापु निळ सर , जावळे सर ,.सरपंच सुभाष पाटील, महादेव धोंडे, मुकुंद पाटील, संदेश पाटील, काका हानपुडे, आण्णा सपकाळ पोपट मांढरे,जि प प्राथमिक शाळेचे मुख्यध्यापक. काटमोरे सर, लांडगे सर यांचे सहकार्य मिळाले. लघुपटात मुख्य भूमिकेत स्वतः महादेव मांढरे हे असुन दिग्दर्शक म्हणुन देखील तेच काम करत आहेत त्यांच्या लघु चित्रपटांना मिळालेल्या पुरस्कारा मुळे मित्र परिवार कडून कौतुक होत आहे. ‐-----

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

गौंडरे प्रतिनिधि

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

गौंडरे येथील चौथी पास असलेल्या महादेव मांढरे यांना बालपनापासुन अभिनयाचे वेड होते अखेर मोठ्या कष्टाने त्यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पन केले आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts