loader
Breaking News
Breaking News
Foto

तालुक्यातील तिन काखान्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना अक्रमक! 30 जुलै रोजी धरणे आंदोलन. शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन

करमाळा तालुक्यातील मकाई , भैरवनाथ , कमलाई या तिन्ही कारखान्या च्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना अक्रमक झाली असून मकाई व भैरवनाथ ने शेतकऱ्यांची बिलं थकवल्याबद्दल तसेच कमलाई कारखान्याने वाहनधारकाच्या नावे काढलेले बोगस कर्ज या विरोधात 30 जुलै रोजी तहसीलदार यांच्या कार्यालया समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतिने धरणे आंदोलना करण्यात येणार आहे. या बाबत चे निवेदन तहसील कार्यालयात देण्यात आले असून नायब तहसीलदार जाधव यांनी ते स्विकारले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

निवेदनात म्हटले आहे की मार्च महिन्यात आर सी सी नुसार कारवाई करण्याचे जिल्हाधीकारी यांचे आदेश आहेत तरी देखील कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याने आंदोलन करावे लागत आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुदर्शन शेळके. जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे. जिल्हा उपाध्यक्ष दीपक शिंदे. तालुका युवा आघाडी अध्यक्ष अमोल घुमरे. तालुका पक्षाध्यक्ष बाप्पू फरतडे. तालुका उपाध्यक्ष तानाजी शिंदे. जातेगाव चे सरपंच छगन ससाणे. ग्रामपंचायत सदस्य प्रमोद वारे. संदीप शिंदे. बलभीम धगाटे. सचिन शेळके. ज्योतीराम धगाटे.हे उपस्थित होते

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

शेतकरी वाहनमालक यांनी या आंदोलनात हजारो च्या संख्येत सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेच्या वतिने करण्यात आले आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts