loader
Breaking News
Breaking News
Foto

करमाळा तालुक्यातील गौंडरे येथे कृषि सल्ला केंद्राचे उदघाटन

गौंडरे (ता करमाळा) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज येथील कृषीदूत अजिंक्य दत्तात्रय शिंदे यांच्या वतीने गौंडरे येथे आयोजित कृषी सल्ला केंद्राचे उदघाटन गौंडरे गावचे सरपंच सुभाष हनपुडे व गावातील इतर शेतकरी बांधवाच्या उपस्थित पार पडले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, रत्नाई कृषी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.डी.पी.कोरटकर , प्राचार्य आर. जी.नलवडॆ , कार्यक्रम समन्वयक प्रा.एस.एम.एकतपुरे ,कार्यक्रम अघिकारी प्रा.एस.आर.आडत, प्रा.डी.एस मेटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत अजिंक्य दत्तात्रय शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी कृषी विषयक सल्ला व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

✍ चौफेर प्रतिनीधी

यावेळी राहुल हनपुडे, गणेश कदम, महादेव हनपुडे, संदिपान शिंदे, हनुमंत कोळेकर व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कृषीदूत अजिंक्य दत्तात्रय शिंदे यांनी सामुहिक शेती, सेंद्रिय शेती, फळबाग लागवड व फायदे, शेळीपालन, माती परीक्षण, अशा विविध घटकांवर चर्चा केली.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

राहुरी येथील रत्नाई विद्यापीठ व कृषिदुत अजिंक्य शिंदे यांच्या या उपक्रमाचे शेतकऱ्यांतुन कौतुक होत आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts