करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना पहिल्यांदाच मतदानाचा अधिकार आल्यानंतर झालेली निवडणूक प्रचंड गाजली ,मतमोजणीनंतर सुरु असलेले बाजार समितीतील शह-कटशह व आरोप प्रत्यारोप चे सुरु असलेले राजकारण अजुन देखील संपायाला तयार नाही . जगताप गटाकडून चिंतामणी जगताप व दिग्विजय बागल यांच्या सदस्यत्वावर अक्षेप घेतल्यानंतर विद्यमान उपसभापती चिंतामणी जगताप यांचे बंधु प्रतापराव जगताप यांनी जयवंतराव जगताप यांचे संचालक पद रद्द करण्यासाठी वरिष्ठ विभागीय सह. निबंधक यांच्याकडे धाव घेतली असून चिंतामणी जगताप दिग्विजय बागल यांच्या प्रमाणे प्रतापराव जगताप यांच्या अर्जा मुळे जयवंतराव जगताप यांच्या संचालक पदावर देखील टांगती तलवार निर्माण झाली आहे .
बाजार समितीच्या राजकीय उलथापालथीचा सविस्तर आढावा घेयचा झाल्यास सप्टेंबर 2018 रोजी बाजार समितीच्या निवडणुकीचे मतदान होवुन निकाल घोषित झाल्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर सभापती उपसभापती पदाची निवडणुक पार पडली जगताप -पाटील युतीतुन विजयी झालेले प्रा शिवाजीराव बंडगर बागल गटात डेरेदाखल झाल्याने सभापती पदी प्रा शिवाजीराव बंडगर व उपसभापती पदी चिंतामणी जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.याच निवडी दरम्यान झालेल्या मारामारीत दिग्विजय बागल यांच्यावर खुणी हल्ला झाल्याची फिर्याद दाखल झाली त्या दिवसापासून बाजार समितीतुन तालुक्यातील विज, रस्ते, हमीभाव या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होण्या ऐवजी हे सगळे विषय धुळखात पाडून या कडे दुर्लक्ष करून बाजार समितीत एकापाठोपाठ एक केलेल्या वादामुळे बाजार समिती महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली.
सोलापूर जिल्हा उपनिबंधक हे न्याय करतील ह्या अपेक्षेने आम्ही त्यांच्याकडे सबळ पुराव्यासह जयवंतराव जगताप यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे आशी अर्जा द्वारे मागणी केली होती परंतु त्यांच्यावर आलेल्या राजकीय दबावामुळेच त्यांनी आमचा अर्ज फेटाळला असावा असे आम्हास वाटते त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा वरिष्ठ विभागीय सह निबंधक पुणे यांच्याकडे जयवंतराव जगताप यांचे संचालक पद रद्द करण्यात यावे असा आर्ज दाखल केला असून त्यांनी तो स्विकारला आहे व त्याची सुनावणी 28 जुलै रोजी होणार असून आमच्या बाजुने दिग्विजय निकाल होवुन जयवंतराव जगताप यांचे सदस्यत्व रद्द होवुन सत्याचा विजय होईल आशी आम्हाला खात्री असुन अगर सत्य है तो कियु परेशान है ! अगर परेशान है , तो वह सत्य नाही है ! असा आश्वासक डायलॉग देखील प्रतापराव जगताप यांनी मारला आहे प्रतापराव जगताप (युवा नेते )
जयवंतराव जगताप हे केम व वांगी या गटातील दोन्ही जागेवर विजयी झाल्याने त्यांनी वांगी गणाचा राजीनामा दिला.त्यामुळे सत्ताधारी बागल गटाकडून केम गटातील पराभव झालेले महाविर तळेकर यांची कायद्यातील तरतुदीनुसार स्वीकृत संचालक म्हणून निवड केली या दरम्यान जयवंतराव जगताप हे 307 कलम लागलेले असल्याने फरार होते मात्र अशा कठीण काळात त्यांच्या काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी एकाकी झुंज देत महाविर तळेकर यांच्या निवडीवर स्थगिती मिळवली येथुनच खऱ्या अर्थाने बाजार समितीत शहकटशहाच्या राजकारणास सुरवात झाली.या नंतर बागल गटाने सदाशिव पाटील यांच्यावर अक्षेप घेऊन त्यांना आपात्र केले याला उत्तर म्हणून जगताप गटाने त्यावेळचे भाजपचे मंत्री प्रा राम शिंदे यांच्याकडे वजन वापरून दिग्विजय बागल यांना अपात्र केले.प्रतिडाव म्हणून युवा नेते प्रतापराव जगताप यांनी जयवंतराव जगताप यांच्या कुटुंबातील सर्व सदस्याच्या नावे व्यापारी लायसन्स नसले तरी बाजार समितीच्या मालकीच्या रिकाम्या जागा, गोडावुन, बांधलेल्या इमारती व गाळे भाडेतत्त्वावर असल्याचे सबळ पुरावे सोलापूर जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सादर करुन जयवंतराव जगताप यांचे संचालक पद रद्द करण्याबाबत आपिल केले होते.मात्र ते फेटाळले गेले होते .
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.