loader
Breaking News
Breaking News
Foto

जो आई-वडिलांची सेवा करतो, त्यांच्याजवळ कायमच विठ्ठल उभा राहतो - उपसभापती पैलवान दत्तात्रय सरडे यांनी कृतीतून दिला अनोखा संदेश!

आज आषाढी एकादशीनिमित्त करमाळा पंचायत समीतीचे उपसभापती पै दत्तात्रय सरडे यांनी आई वडीलांची सेवा हिच खरी विठ्ठल-रखुमाई ची भक्ती असल्याचे दाखवून दिले आहे विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरीच्या वारीला आपण जातो पण पंढरीमध्ये कटेवरी हात ठेवून उभा असणारा विठुराया कोणासाठी उभा आहे तर तो आई वडिलांची सेवा करणाऱ्या पुंडलिकासाठी उभा आहे. जो आई-वडीलांची सेवा करतो त्याच्या जवळ विठ्ठल-रखुमाई सोबत असतात आसे त्यांनी म्हटले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

दत्तात्रय सरडे यांचे आई वडील वृद्धापकाळाने व आजार पणाने थकले आहेत मात्र पैलवान व राजकीय पिंड असलेले उपसभापती दत्तात्रय सरडे हे पाहटे पाच वाजल्यापासून आई वडीलांची मालीश करणे ,व्यायाम करुन घेणे ,अंघोळ घालणे केस विंचरणे, एवढेच नव्हेतर स्वतःच्या हाताने आईवडीलांना जेवण भरवल्या नंतरच आपल्या दिनचर्येला सुरवात करतात आई वडीलांना त्रास देणाऱ्या पुंडलिक च्या मनांत जेव्हा परिवर्तन झालं, तेव्हाच तो आईवडिलांची सेवा करू लागला. तीही इतकी मनापासून की त्याने भेटायला आलेल्या देवासाठी वीट भिरकावली. विटेवर उभा झाला म्हणून तो विठोबा!आज आपण त्याच्या साठी शकडो किलोमीटर चालत जातो मात्र अनेकांना आपल्या आई वडिलांचा विसर पडत चालला आहे आज अनेक घरांत आई-वडील अडगळीत पडलेत, म्हणूनच वृद्धाश्रम वाढलेत.आशा लोकांच्या डोळ्यात दत्तात्रय सरडे यांनी झणझणीत अंजन घातले आहे आई-वडील ही जगातील सर्वात मोठी संपत्ती असून त्यांची अहोरात्र सेवा करा. आईवडिलांची सेवा ही 33 कोटी देव देवातांच्या सेवेप्रमाणे आहे. म्हणून आईवडिलांची सेवा ही ईश्वर सेवा आहे असे त्यांनी म्हटले आहे. काल त्यांनी एकादशी या विषयाला धरून आई वडीलांची सेवा करतानचे फोटो फेसबुकवर अपलोड केले आहेत त्यामुळेच हा लेखन प्रपंच करावासा वाटला सोबत दत्तात्रय सरडे यांची पोस्ट देखील जोडत आहोत.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ! पुराणातील पुंडलिक असो अथवा श्रावणबाळ यांच्या कथा ऐकतच आपण लहानाचे मोठे झालो त्यांनी माता पित्याच्या सेवेसाठी केलेले अपरिमित कष्ट आपल्या सगळ्यांना माहीतच आहेत. त्यांनी घालून दिलेल्या कार्याचा वसा आपण निरंतर पुढे चालू ठेवणे आपलं कर्तव्य आहे आणि हे एक प्रकारे संस्काराचं देणं असतं. आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे जे कर्म वडील करतात त्याच अनुकरण मुलं करतात किंवा येणारी पिढी करत असते.अर्थात हे त्या त्यावेळी असणाऱ्या परिस्थितीवर, होऊ घातलेल्या संस्कारावर आणि मनाच्या स्थितीवर अवलंबून असणाऱ्या गोष्टी आहेत. पण भविष्याचा विचार करताना वर्तमानातले सुखद क्षण हातून निसटले नाहीत पाहिजे म्हणून जे जे शक्य ते ते करण्याची तयारी मनुष्याने ठेवली पाहिजे. माझा रोजचा दिनक्रम याच विचारात होतो की आज आई-वडिलांची सेवा आणखी कशी चांगली करता येईल. त्यामुळे उतारवयामुळे आलेला थकवा, आजारपण या गोष्टी नित्याच्याच पण आपला मायेचा उबदार स्पर्श आणि आश्वासक बोलणं उतारवयात सुद्धा माणसाला आधार देतं आणि उरलेलं आयुष्य सुसह्य करण्यास मदतगार ठरतं. दिनक्रमाचा भाग म्हणून रोज आईला सकाळी मॉर्निंग वॉकला फिरवून आणणे, तिचे विविध व्यायाम करून घेणे, हातापायांची मालिश करणे, वेगवेगळे औषधी काढे तयार करणे या गोष्टींबरोबरच वडिलांची ही सेवा करण्याचे भाग्य लाभत आहे. त्यांची सेवा सुश्रुषा करणे, त्यांना अंघोळ घालणे, हवं नको ते पाहणे हे पाहण्यातच माझ्या दिवसाची सुरुवात होते. हे करत असताना कुठेतरी एक मनस्वी समाधान आत सतत जाणवतं की आपल्याला वाढवताना या विठ्ठल-रखुमाई ने काय अपार कष्ट सोसले असतील. याची कल्पना त्यांची सेवा करताना पदोपदी येते तेव्हा त्यांचे पांग काही केल्या फिटणार नाहीत. परंतु एक कर्तव्यपूर्तीची भावना मनात निश्चित असते की जी प्रत्येकाच्या मनात असायला हवी. त्या पुंडलिकाला प्रत्यक्ष पांडूरंगाने भेट दिली परंतु माझ्यासाठी माझे विठ्ठल-रखुमाई रोजच माझ्यासमोर आहेत आणि त्यांच्या चरणाजवळ माझी सेवा मी समर्पित करत आहे. (पै दत्तात्रय सरडे)

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts