मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ठाकरे सरकार चे कोरोना काळातील लोकोपयोगी कार्य सर्वसामान्य जनते पर्यंत पोहचवणे व सामान्य नागरींकाच्या तक्रारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पर्यंत पोहचवण्यासाठी शिवसेनेच्या वतिने राज्यभर शिवसंपर्क अभियान धुमधडाक्यात सुरु आहे . राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, आमदार हे प्रत्येक तालुक्यातील जिल्हापरिषद गट पंचायत समिती गणात जावुन शिवसंपर्क अभियान प्रभावी पणे राबवत आहेत. आगामी जिल्हापरिषद पंचायत समिती निवणुकांच्या अनुषंगाने हे अभियान म्हतवाचे समजले जात आहे.करमाळा तालुक्यात मात्र "शिवसंपर्क अभियान म्हणजे काय रे भाऊ? अशिच परस्थिती असुन सध्या तरी हे अभियान फक्त कागदावरच राबिवले जात असल्याने शिवसंपर्क अभियान करमाळा तालुक्यात फक्त फार्सच ठरते की काय? आशी शंका घेण्यास वाव मिळत आहे
2019 च्या विधानसभा निवडणुकीत.एकमेकांचे प्रतिस्पर्धी राहिलेले रश्मी बागल व शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील हे दोन्ही म्हतवाचे नेते आजमितीस शिवसेनेतच असल्याचा दाव करीत आहेत माजी आमदार नारायण पाटील यांच्या हाती देखील शिवबंधन असुन स्वताच्या गाडीवर शिवसेनेचा लोगो आहे. रश्मी बागल यांचे बंधु दिग्विजय बागल यांच्या मनगटावर देखील शिवबंधन असुन गाडीवर भला मोठा धनुष्यबाण व शिवसेना लोगो आहे मात्र "शिवबंधन दोघांच्या हाती शिवसंपर्क अभियानास येईना गती" आशीच आवस्था आहे.
गटबाजी संपल्यास व सर्व पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने काम केल्यास रमाळा तालुका शिवसेनेचा बालेकिल्ला बणु शकतो ,मात्र पुर्वी संपर्क प्रमुख पदा बरोबरच मुंबई वरुन येणारे निरिक्षक हे जिल्हापरिषद गट निहाय पक्षबांधणीचा आढावा प्रत्येक महिन्याला घेत होते त्यामुळेच पक्ष वाढी बरोबरच गटबाजीस चाप लागत होता पुन्हा एकदा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष निरिक्षकांची नेमणुक करावी आशी मागणी शिवसैनिकांतुन जोर धरत आहे
करमाळा माढा या दोन तालुक्या साठी धनंजय डिकोळे हे जिल्हा प्रमुख म्हणून काम पाहत आहेत नुकतीच त्यांनी करमाळा तालुक्यात शिवसंपर्क अभियान बाबत मोजक्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन बैठक घेतल्याने बर्याच आजी माजी पदाधिकाऱ्यांकत या अभियाना बाबत माहिती पोहोचली नाही ,अभियान राबवण्या बाबत विचार विनिमय होण्या ऐवजी शिवसेनेची धुरा बागल -की पाटील यांच्यावर या बाबतच अधिक चर्चा झाल्याचे समजते. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करायचे व विधान सभा जिल्हापरिषद पंचायत समिती निवणुकांत आयारामांना संधी मिळत असल्याने पदाधिकाऱ्यांकडून फक्त कागदावरच बांधणी सुरु असल्याचे दिसत असुन प्रत्यक्षात मात्र शिवसेनेचा पाया सक्षम नेतृत्वाआभावी खचलेला दिसत आहे. आंदोलन मोर्चे, या बाबतीत करमाळ्याची शिवसेना जिल्ह्यात ओळखली जात होती मात्र सध्या शिवसनेला मरगळ आल्याचे वास्तववादी चित्र निर्माण झाले आहे हे कोणीच नाकरु शकणार नाही.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.