loader
Breaking News
Breaking News
Foto

सावडी येथील स्नेह ग्रुप ठरतोय कोरोना काळात मार्गदर्शक तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका ओळखून दोनशे पालकांना मार्गदर्शन! .

सामजीक कार्यात अग्रेसर असलेल्या स्नेह ग्रुपने कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत सावडी गावात कोवीड सेंटर उभा करण्या पासुन ते कोवीड सेंटर मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दहा लाखांचा विमा उतरवण्यात मोलाचा वाटा उचलला होता. तसेच गावात गोरगरीब लोकांना अन्न धान्य किटचे वाटत करण्यात आले होते गावात लसीकरण तसेच कोरोना बाबत जनजागृती करुन गाव कोरोना मुक्त करण्यात या ग्रुपचे योगदान मोलाचे ठरत आहे.तसेच इतर वेळी वृषारोपन तसेच विविध सामाजिक उपक्रम या ग्रुपच्या वतिने राबविण्यात येत असल्याने स्नेह ग्रुप ग्रामस्थांच्या मनात स्नेह निर्माण करत आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

भविष्यातील तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना असलेला संभाव्य धोका लक्षात घेता या ग्रुपच्या माध्यमातून आत्तापासूनच उपाययोजनांबाबत जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. सावडी येथील सुपुत्र व बिजे मेडिकल मधुन सारख्या नामांकित शिक्षण संस्थे मधुन एमबीबीएस व एम डी पर्यंत चे शिक्षण पुर्ण केलेले डाॅ नवनाथ जाधव, मुंबई येथे गॅलेक्सी फार्मास्युटिकल कंपनी मध्ये काॅलिटी मॅनेजर म्हणून कार्यरत असलेले केशव शेळके,पुणे येथे स्थायिक असलेले आनंदजी आब्बड यांच्या संकल्पनेतून लहान मुलांपासून ते त्यांच्या पालकापर्यंत येणाऱ्या कोवीड तिसऱ्या लाटेचा कशा प्रकारे सामना करायचा व सुचना विषयी ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात येत आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

कोरोना काळात लहानग्यांची कशा प्रकारे काळजी घेवायची या बाबत गुगल मिटद्वारे ग्रुप करुन पालकांशी संवाद साधण्यात येत आहे.रविवार दिनांक 18 जुलै रोजी पहिले मार्गदर्शक शिबिर पार पडले असून या मध्ये जवळपास दोनशे पालक व 12 वर्षाखालील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या संवादा मध्ये लहान मुलांमध्ये कोविड झाला आहे हे कसे ओळखावे, लक्षणेकाय असतात.? 2) साधारण सर्दी ताप हे वायरल आजार सुद्धा आज पालकांची चिंता वाढवत आहेत तर हे वायरल आजर कसे ओळखावे? 3 कोवीडचे शंकानिरसन करताना टेस्टिंगकधी व कसे करावे.? 4) लहान मुलांना कोविड झाला असेल तर कशी उपचार पद्धती असते. लाइन ऑफ ट्रीटमेंट काय असते? ५) कोविड झालेल्या बाळाचे विलगीकरण कशा प्रकारे केले जाते? जेणेकरून बाळा पासून त्याच्या बहिण भावांना,मित्रांना पालकांना व प्रादुर्भाव होऊ नये या साठी काय करावे? 6) प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चा आहार व दिनचर्या कसी असावा आणि काय काळजी घेतली जावी? 7)लहान मुलांमध्ये 1 ते 6 आणि सहा ते बारा वयोगटातील कुठल्या वयोगटात जास्त काळजी घ्यावी.? 8) लहान मुलांमधील लसीकरण आणि त्या संबंधी माहिती कशी मिळवावी? 9) लहान मुलांच्या ट्रीटमेंट चा खर्च अंदाजे किती असू शकतो.? 10) एखादी महिला कोविड पॉझिटिव्ह असेल तर ती बाळाला स्तनपान करू शकते का.? 11) प्रेग्नेंट महिलांनी कुठली काळजी घ्यावी? नवजात शिशु ज्यांना मास्क पण घालता येत नाही किंवा साधारण दोन वर्षे वय असलेल्या मुलासाठी काय विशेष सुचना? 12) mucermice and misi या बुरशींचा लहान मुलांवर ती काही परिणाम होतो का? 13) तिसरी लाट किंवा आता आलेला डेल्टा हा वायर्स लहान मुलांना कितपत धोकादायक आहे ?काळजी घेणं म्हणजे पालकांनी नक्की काय करणं? 14) covid- प्रादुर्भाव होवूच नये यासाठी काय करावे? 15) कोविड काळात तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने पालकांनी आपली जबाबदारी कशा प्रकारे पार पाडावी.? 16 ) एक डॉक्टर म्हणन आपण गेल्या दीड वर्ष पासून डॉक्टर म्हणून पेशंटच्या सम्पर्कत येता , पण आपल्या घरी देखिल लहान मुले आहेत मग एक डॉक्टर किंवा एक वडील म्हणून आपण कशी काळजी घेता? इत्यादी प्रश्न विचारले जात असून या बाबत योग्य व सकारात्मक समुपदेशन स्नेहा ग्रुप च्या वतीने करण्यात येत आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts