loader
Breaking News
Breaking News
Foto

दहिगाव उपसाच्या कामांचे खोटे श्रेय घेण्यासाठी सुप्रमाची आकडेवारी जशी जनतेला सांगत आहात तसेच आपण कोणत्या बँकेतून किती रक्कम कर्जापोटी उचलली याची आकडेवारी दिली तर बरे होईल- माजी आमदार नारायण पाटील यांचा आमदार शिंदे यांना टोला!

दहिगाव उपसाच्या कामांचे खोटे श्रेय घेण्यासाठी सुप्रमाची आकडेवारी जशी जनतेला सांगत आहात तसेच आपण कोणत्या बँकेतून किती रक्कम कर्जापोटी उचलली याची आकडेवारी दिली तर बरे होईल आसा खोचक टोला माजी आमदार नारायण पाटील यांनी आमदार संजयमामा शिंदे यांना लगावला असुन रिझर्व्ह बॅंक शेतकऱ्यांना फसवून कर्ज काढा असे सांगते का? असा सवाल देखील उपस्थित केला आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

शेतकरी कर्ज फसवून प्रकरणानंतर आमदार संजयमामा शिंदे मतदार संघात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी गाजलेल्या शेतकरी कर्ज प्रकरणांविषयी प्रथमच त्यांनी स्पष्टीकरण दिले. याचा धागा पकडून आज माजी आमदार नारायण पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे परत एकदा बँक कर्ज प्रकरणांना उजेडात आणण्याचा प्रयत्न केला आहे.याबाबत बोलताना पाटील म्हणाले की, शेतकर्‍यांच्या नावावर विना संमती कर्ज काढल्यानंतर आमदार शिंदे हे आऊट आॅफ रेंज होते. आज त्यांना मतदार संघाची आठवण झाली व यातही कर्जबाजारी शेतकऱ्याला बँकेकडून आलेल्या नोटींसाबाबतची जबाबदारी न स्वीकारता रिझर्व्ह बँकेच्या नियमावलीचा दाखला देत स्वतः ची सोडवणूक करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. दहिगाव उपसाच्या कामांचे खोटे श्रेय घेण्यासाठी सुप्रमाची आकडेवारी जशी जनतेला सांगत आहात तसेच आपण कोणत्या बँकेतून किती रक्कम कर्जापोटी उचलली याची आकडेवारीही दिली असती तर बरे झाले असते. परंतु तेवढी हिंमत व नैतिकता आ. शिंदे यांच्यात नाही असे पाटील यांनी म्हटले आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

विविध बँकांकडून शेतकऱ्यांच्या नावावर खोटी कागदपत्रे वापरुन कारखान्यासाठी कर्ज काढले हे मान्य करत आहात तर कर्जाचा एकुण आकडाही जगजाहीर करा. कर्जफेड केली का? पंजाब नॅशनल बँके सह अनेक इतर बँकाबरोबर कशी सेटलमेंट केली याचाही खुलासा केलात तर बिचारा शेतकरी चिंतामुक्त होईल. अन्यथा या प्रकरणी शेतकऱ्याला इतर बँकाचे दरवाजे मात्र कायमस्वरूपी बंद झाल्याची शक्यता नाकारता येणार नाही. याबाबतही आपण रिझर्व्ह बँकेच्या नियमावलीचे पुस्तक दाखवून हात वर करणार का ? असा सवाल देखील माजी आमदार नारायण पाटील यांनी उपस्थित केला आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

करमाळा मतदार संघाच्या इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल 2014 ते 2019 मध्ये वीज, सिंचन, रस्ते व आरोग्य या विषयी बरीच पायाभरणी झाली आहे.तर 2024 पर्यंत चालू राहतील एवढे विकासकामांचे प्रस्ताव मी शासन दरबारी केंव्हाच दाखल केले आहेत. माझ्या कामांचे रिझल्ट मिळाले नाहीत असं म्हणत आहात तर मग करमाळा तालूक्यात 25 हजार मतांनी मला मिळालेली मतांची आघाडी ही केवळ विकासकामांची जनतेने दिलेली पोचपावती आहे हे लक्षात ठेवा. करमाळा संघात लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना माढा तालूक्याचे दाखले देत असाल तर मतदारांसाठी हा कोणता इशारा आहे असे समजावे. शेतकर्‍यांच्या नावावर खोटी कागदपत्रे वापरुन आपण कर्ज काढायची आणि त्या कर्जाची परतफेड करा अशी नोटीस बँकेने मात्र शेतकऱ्याला पाठवायची हि काही रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार नाही. आणि याबद्दल जर आम्ही शेतकऱ्याची बाजू घेऊन न्यायाची मागणी केली तर आज आपण आम्ही राजकारण करतोय असं म्हणून स्वताची लबाडी झाकु नये. माझ्या पाच वर्षाच्या कालावधीत माझ्यावर भ्रष्टाचार केल्याचा एकही आरोप नाही.यामुळेच तुम्हाला सवाल करण्याची नैतिकता व अधिकार मला जनतेनेच दिला आहे. कर्जप्रकरणावर तपशीलवार खुलासा करावा आणि नंतरच जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या गप्पा माराव्यात असा खणखणीत इशारा माजी आमदार नारायण पाटील यांनी दिला.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts