loader
Breaking News
Breaking News
Foto

दहिगाव उपसा सिंचन योजना रखडवण्यामध्ये बिनीचे शिलेदार म्हणजे माजी आमदार नारायण पाटील. विलास पाटील यांच्या नंतर विलास राऊत यांची पाटील यांच्यावर टिका!

दहिगाव योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेवरुन सुरु असलेला आजी -माजी आमदारातील श्रेय वादाचा लढा आता चांगलाच तापताणा दिसत आहे. आमदार संजयमामा शिंदे यांनी 342. 30 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता मंजूर करून आणल्यानंतर नारायण पाटील यांनी दहिगाव योजनेस एक रुपया निधी आणला नाही सुधारित प्रशासकीय मंजुरीसाठी देखील प्रयत्न केले नाहीत असा आरोप केला होता. या आरोपला माजी आमदार नारायण पाटील यांनी पुराव्यासह पत्रकार परिषद घेऊन जोरदार उत्तर दिले होते ,सुप्रमा मंजूर करण्या पेक्षा निधी मिळवणे म्हतवाचे असते आसे सांगत 90 कोटींचा निधी मिळवून 24 कोटी रुपयांपर्यंत भूसंपादनाचे पैसे शेतकऱ्यांना मिळवुन दिले असे सांगीतले होते,तसेच कुठलाही राजकीय द्वेष मनात बाळगून एकही शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले नाही मात्र विद्यमान आमदार दहिगाव च्या पाण्याचे देखील राजकारण करत असल्याचा आरोप केला होता व आगोदर फसवणुक करून कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांचे सातबारे कोरे करा असा घणाघात केला होता.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

आजी माजी आमदारांचे आरोप प्रत्यारोप झाल्याने हा मुद्दा शांत होईल असे वाटत असतानाच नारायण पाटील यांचे बंधु व लव्हे गावचे विद्यमान सरपंच यांचे पती व माजी पंचायत समिती सदस्य विलास पाटील यांनी जे स्वतःच्या गावातील तलावात पाणी आणु शकले नाहीत ते पाणीदार आमदार कसे ?आसा सवाल करत माजी आमदार नारायण पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. आज घोटी येथील माजी जिल्हापरिषद सदस्य विलास राऊत यांनी या वादात उडी घेऊन थेट माजी आमदार नारायण पाटील यांच्यावर खरमरीत टिका केली आहे .

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

विलास राऊत यांनी म्हटले आहे कि 2014 साली बागल यांना ही योजना चालू करता येऊ नये म्हणून नारायण पाटील यांनी जिवाचा आटापिटा करून आपल्या नात्यागोत्यातील मंडळींना पुढे करून दहीगाव च्या टप्पा एक मधील पाईपलाईनचे काम पूर्ण होऊन दिले नाही .म्हणजे खऱ्या अर्थाने दहिगाव उपसा सिंचन योजना रखडवण्यामध्ये बिनीचे शिलेदार म्हणून माजी आ. नारायण पाटील यांचा उल्लेख करावा लागतो आशी बोचरी टिका केलो आहे तसेचआ.संजयमामा शिंदे यांनी दहिगाव योजनेसाठी 342.30 कोटीची सुप्रमा मंजूर केल्यामुळे कॅनॉलची अपूर्ण कामे वेगाने पूर्ण होतील. त्यामुळे टेलच्या भागातील शेतकरी आमदार शिंदे यांच्या निर्णयामुळे समाधानी आहेत. त्यांच्या या विधायक कामात माजी आमदारांनी खोडा घालू नये ही अपेक्षा माजी जिल्हापरिषद सदस्य विलास राऊत यांनी व्यक्त केली.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

विलास पाटील व विलास राऊत यांनी केलेल्या टिकेला पाटील गटाकडून अजून तरी गांभीर्याने घेतले नसले तरी या टिकेला पाटील गट उत्तर देणार का या कडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts