loader
Breaking News
Breaking News
Foto

रामचंद्र खोमणे यांच्या शेतातील वेगळ्या प्रयोगाचा कृषीकन्या वर्षाराणी नाझरकर यांनी घेतला आढावा .

रामचंद्र खोमणे गुलमोहरवाडी मधील प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. त्यांना एकूण पंधरा एकर शेती आहे. त्यातील एक एकर शेतीमध्ये त्यांनी गुलाबांचे रूपे तयार करण्यासाठीची लागणारे खुंट रोपांचे लागवड केलेली आहे. इंडिका जातीची रोपे त्यांनी लावलेले आहेत.रामचंद्र खोमणे यांच्या शेतातील वेगळ्या प्रयोगाचा कृषीकन्या वर्षाराणी नाझरकर यांनी घेतला नुकताच आढावा घेतला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

एक एकर शेतीमध्ये साधारणतः चार हजार रोपे त्यांनी लावलेली आहे आहेत. दहा ते अकरा महिन्यांमध्ये कांड्या कट करण्यासाठी तयार होतात. एका कांडीला 1ते सव्वा रुपया पर्यंत भाव मिळतो. एक एकर शेतीमध्ये दोन ते अडीच लाख कांड्या मिळतात त्या कांड्यांना नर्सरी मध्ये त्यांना कलम करून वेगवेगळ्या जातीचे गुलाब रोपे तयार केली जातात. एक एकर क्षेत्रामध्ये साधारणता 40 ते 60 हजार रुपयांचा खर्च येतो आणि दोन लाख रुपये पर्यंत नफा दहा ते बारा महिन्यांमध्ये मिळतो. अशी माहिती रामचंद्र खोमणे यांनी दिली आणि तरुण पिढीला सांगितले कि नोकरीच्या मागे लागन्यापेक्षा स्वतः नोकऱ्या तयार करा आणि शेती व्यवसायाकडे एक नवी संधी म्हणून बघा. शेती मधे नवनवीन प्रयोग करा. यश आपल्या हातात असते त्यासाठी आपला निर्धार ही पक्का असला पाहिजे असे ही ते म्हणाले.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

त्यांनी केलेल्या या प्रगती चा आढावा महात्मा फुले कृषि विद्यपीठ राहुरी अन्तर्गत, कृषि महाविद्यलय बारामती येथील चतुर्थ वर्षात शिक्षण घेणाऱ्या कृषीकन्या वर्षाराणी दिगंबर नाझरकर यांनी घेतला असुन या प्रयोगावर अधिकचे संशोधन करण्याचा प्रयत्न करुन जास्ती जास्त उत्पन्न कसे निघेल याचा विचार करु असे सांगीतले

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

यावेळी रामचंद्र खोमणे, ॠषांत कानतोडे उपस्थित होते

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts