loader
Breaking News
Breaking News
Foto

कृषिकन्या वैष्णवी कादे करणार शिराळा(टे)येथील शेतकऱ्यांना आधुनिक शेती प्रयोगाबद्दल मार्गदर्शन

महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत सेवा संस्कार संस्था मालदाड (संगमनेर) येथील श्रमशक्ती कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनी कृषिकन्या वैष्णवी दत्तात्रय कादे या कृषी जागरूकता व कृषी कार्यानुभव 2021- 22 वर्षा अंतर्गत शिराळ टें तालुका माढा जिल्हा सोलापुर येथील शेतकऱ्यांना अधुनिक व प्रयोगशील शेती बद्दल मार्गदर्शन करणार आहेत

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

कृषी कन्या वैष्णवी कादे या शेतकऱ्यांना कोरोना महामारी चालू असल्यामुळे त्यांनी सुरक्षिततेचे उपाय कोविड लसीकरण जनजागृती तसेच शेतावर जाऊन बीजप्रक्रिया माती परीक्षण एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन प्रक्रिया आणि व्यवस्थापन औषध फवारणी सेंद्रिय शेती यासारखे उपक्रम राबवणार आहे या नवीन उपक्रमातून आधुनिक शेतीला दिशा मिळणार आहे असे कृषीकन्या वैष्णवी काले यांनी चौफेर शी बोलताना सांगितले .

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

कृषिकन्याचे गावात ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी स्वागत केले. यावेळी शिराळ टे गावच्या सरपंच अश्विनी ढेकणे, ग्रामसेवक दौड भाऊसाहेब,किसन भानवसे,धनाजी कादे अरुण भानवसे व इतर शेतकरी वर्ग उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

वैष्णवी कादे व श्रमशक्ती कृषी महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे शेतकऱ्यांतुन कौतुक होत आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts