loader
Breaking News
Breaking News
Foto

१८ जुलै रोजी आनंदऋषी नेत्रालय व कमलादेवी ऑप्टिकल्स, करमाळा यांचे संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

रविवार दिनांक १८ जुलै रोजी आनंदऋषी नेत्रालय व कमलादेवी ऑप्टिकल्स, करमाळा यांचे संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कमलादेवी ऑप्टिकल चे सुरेश चालक यांनी करमाळा चौफेर शी बोलताना दिली असून गरजुन लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

करमाळा येथे श्री. सुरेश चाळक यांचे गेली १८ वर्ष श्री. कमलादेवी ऑप्टिकल नावाने चष्म्याचे दुकान आहे. ते अनेक सामाजिक उपक्रम राबवून नेत्र रुग्णांना सेवा देत आले आहेत. मोफत नेत्र तपासणी, वाजवी दरात चष्मे बनऊन देत आहेत. वाजवी दर व अचूक निदान हे त्यांच्या ऑप्टिकल चे वैशिष्ट्य आहे. सुरेश चाळक यांच्यासह मुलगा नेत्रतज्ञ डॉ. रामानंद चाळक हे पण नेत्र तपासणी करून डोळ्यांचे विकार असणाऱ्या रुग्णांना योग्य मार्गदर्शन करून वाजवी दरात त्यांचं ऑपरेशन कसे होईल याचा सल्ला देतात.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

सदर शिबिर हे रविवार दिनांक १८ जुलै २०२१ रोजी छत्रपती चौक, भवानीनाका, करमाळा येथे आयोजित केले आहे. बिनटाक्याची मोतीबिंदू शस्रक्रिया ही फक्त २२०० रुपये औषध व लेन्स खर्चासहित व फेको पद्धतीने शस्रक्रिया फक्त ५७०० रुपये औषध व लेन्स खर्चासहित करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील डोळ्यांचे विकार असणाऱ्या गरजूनी आजच नोंदणी करून याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्री. सुरेश चाळक यांनी केले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts