loader
Breaking News
Breaking News
Foto

कारखाना बारामती ॲग्रो ला देण्याची प्रक्रिया झाली असताना बँक साखरेची विक्री करूच कशी शकते ? आदिनाथ चे चेअरमन धनंजय डोंगरे यांचा सवाल

आदिनाथ सहकारी कारखान्यात असलेली साखर विक्री करण्यासाठी एम एस सी बँकेने निविदा काढली असून या प्रकियेस आमचा ही विरोध असून आम्ही सहकार न्यायालयात साखर विक्री होऊ नये यासाठी तक्रार केली आहे असे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे यांनी सांगितले .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

पुढे बोलताना डोंगरे यांनी बोलताना म्हटले आहे की यासंदर्भात चुकीच्या पध्दतीने गैरसमज पसरवून दिशाभूल केली जात आहे. मुळात कारखाना बारामती ॲग्रो ला देण्याची प्रक्रिया झाली असताना बँक साखरेची विक्री करूच कशी शकते ?असा सवाल उपस्थित केला आहे कारखाना बारामती ॲग्रो ला २५ वर्षांसाठी १२८ कोटीला भाडेतत्त्वावर देताना त्यात साखरेची किंमत धरण्यात आलेली आहे. त्यातूनही जर बँकेला साखरे ची विक्री करायचीच असेल आणि ६० कोटी च्या किमतीची साखर विक्री नंतर बँक ती किंमत कर्जातून कमी करणार असेल तर उरलेल्या फक्त ६० ते ६५ कोटी कर्जासाठी २५ वर्षाचा करार का झाला असा मुद्दा देखिल डोंगरे यांनी उपस्थित केला आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

डोंगरे पुढे म्हणाले की आम्हाला या साखर विक्रीतुन कामगारांचे पगार, ऊस तोडणी वाहतूक दारांचे देणी व इतर देणी देऊ करायचे आहेत असे म्हणणे आम्ही सहकार न्यायालया पुढे मांडले आहे त्यावर उद्या १६ जुलै ला निकाल होणे अपेक्षित आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

१६ जुलै रोजी सहकार न्यायालयात काय निकाल होतो हे पाहणे आत्ता महत्त्वाचे ठरणार आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts