. कुकडी प्रकल्पासाठी तर चार हजार कोटींची सुप्रमा राज्यपालांकडे तसेच माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांचेकडे पाठपुरावा करून अथक प्रयत्नातून मंजूर करून आणली परंतु याचे राजकीय भांडवल अथवा गवगवा आम्ही केला नाही. कारण सुप्रमा पेक्षा निधी मिळवणे महत्वाचे होय. असे प्रतिपादन माजी आमदार नारायण पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केले . याबाबत अधिक बोलताना ते पाटील म्हणाले कि दहिगाव उपसा सिंचन योजनेस सन 2014 ते 2019 या कालावधीत 90 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजुर करुन घेतला व सतरा वर्षे रखडलेली ही योजना मी माझ्या कालावधीतच कार्यान्वित करुन दाखविली.यामुळे माझे या योजनेसाठी किती योगदान होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही.विद्यमान आमदार संजय शिंदे यांनी श्रेयवादासाठी खोटी विधाने करुन अकलेचे तारे तोडू नयेत, असा हल्लाबोल आज माजी आमदार नारायण पाटील यांनी केला.
नुकतेच दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या 342 कोटीच्या दुसऱ्या सुप्रमेस मंजुरी मिळाल्यानंतर आ. संजय शिंदे यांनी माजी आमदार पाटील यांनी या प्रकल्पासाठी कसलाही निधी मंजुर करुन आणला नाही असे विधान केले होते. या विधानाचा पाटील यांनी आज खरपूस समाचार घेतला.यावेळी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी माझ्या पाच वर्षाच्या कालावधीत पाच अर्थसंकल्पात तसेच एक वेळेस पुरवणी मागणीत असे सहा वेळेस एकुण 90 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मिळाला आहे. यात सन 2014-15 (16 कोटी 50 लक्ष), सन 2015-16 ( 11 कोटी), सन 2016-17 ( 17 कोटी), सन 2017-18 ( 16 कोटी), सन 2018-19 (20 कोटी) आणि सन 2019-20 (10 कोटी) असा निधी मंजुर झाला. माझ्या पाच वर्षाच्या कालावधीतच भूसंपादनाच्या कामासाठी 24 कोटी रुपयांचा निधी मंजुर होऊन प्रकल्पग्रस्तांना रक्कम सुध्दा देण्यात आली. अहोरात्र झटुन या योजनेची रखडलेली कामे पूर्ण करुन दोन्ही पंपगृहांची चाचणी घेतली व माझ्या कालावधीतच रब्बी, खरीप तसेच उजनी ओव्हर फ्लो या माध्यमातून आवर्तने सुध्दा देण्यात आली. प्रत्यक्ष टेल एन्डला असलेल्या घोटी या गावच्या कार्यक्षेत्रात पाणी पोहोच केले. तिथुनही पुढे वरकुटे हद्दीतील बंधारेही आपण भरून दिले. योजनैची मुळ किंमत 57 कोटी 66 लक्ष एवढी असताना 1996 साली मंजुर झालेली ही योजना पुर्ण व्हायला 2017 साल उजाडले व या प्रकल्पाची किंमत सन 2009 साली 178 कोटी 99 लक्ष एवढी झाली. आज हिच योजना 342 कोटी पर्यंत जाऊन पोहचली.एखाद्या काम चालू असलेल्या प्रकल्पाची सुप्रमा मंजुर करणे ही बाब काही अवघड नसुन वास्तविक हा पुर्णत: तांत्रिक व कार्यालयीन कामकाजाचा भाग आहे. लोकप्रतिनिधीचे खरे काम या योजनेसाठी निधी मंजुर करुन घेणे हेच असते. यामुळे गेल्या दोन वर्षात या योजनेसाठी किती निधी मंजुर करुन आणला हे आ. शिंदे यांनी सांगावे. यामुळेच मग आयत्या पीठावर रेघोट्या कोण ओढत आहे हे जनता जाणुन आहे. कुकडी प्रकल्पासाठी तर चार हजार कोटींची सुप्रमा राज्यपालांकडे तसेच माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांचेकडे पाठपुरावा करून अथक प्रयत्नातून मंजूर करून आणली परंतु याचे राजकीय भांडवल अथवा गवगवा आम्ही केला नाही. कारण सुप्रमा पेक्षा निधी मिळवणे महत्वाचे होय. असेही पाटील यांनी नमुद केले.
दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी माझे असलेल्या योगदानाची नोंद प्रत्यक्ष विधान मंडळाच्या कामकाजात आहे. यामुळे आ. शिंदे यांनी तिथेही माझ्या कालावधीत या कामासाठी मांडलेले प्रश्न, मंजुर निधी, विविध बैठका याची माहिती घेऊन जनतेसमोर प्रसिद्ध करावी. उगीच खोट्या श्रेयवादासाठी विधाने करु नयेत, यामुळे स्वतःच्या कारखान्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर खोटी कागदपत्रे वापरुन काढलेली बोगस कर्ज प्रकरणे दबणार नाहीत,असा टोलाही माजी आमदार नारायण पाटील यांनी लगावला.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.