loader
Breaking News
Breaking News
Foto

मोरवडला असणारी दत्तक बँक बदलून द्या ,राष्ट्रवादीचे महेश काळे पाटील यांची तहसीलदार यांच्याकडे मागणी icici बॅंक शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याचा आरोप

शेतकऱ्यांना पिक कर्ज तसेच इतर उद्योगा साठी कर्ज देण्यासाठी icici बँकेला मोरवड गाव दत्तक दिले आहे परंतु या बँकेत शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याने सदरची बँक बदलून द्या अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महेश काळे पाटील यांनी तहसिलदार समीर माने यांच्याकडे लेखी निवेदना द्वारे केली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

याबाबत करमाळा तहसीलदार यांना गावकरी शेतकऱ्यांसोबत निवेदन दिले आहे.निवेदनात म्हटले आहे की,मोरवड ता.करमाळा हे गाव सध्या icici शाखा करमाळा या बँकेकडे दत्तक आहे परंतु सदरची बँक शेतकऱ्यांना कर्जवाटप करताना अनेक जाचक अटी नियम दाखवून शेतकऱ्यांची अडवणूक करत आहे.यामुळे अनेक पात्र शेतकरी कर्ज मिळण्या पासून वंचीत आहेत.त्यामुळे प्रशासनाने मोरवड गावासाठी दुसरी नॅशनलाईज बँक दत्तक द्यावी .

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

सदर निवेदनावर राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीनभाऊ झिंजाडे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे करमाळा तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव,जि.सरचिटणीस महेश मोरे,किसान सेलचे तालुकाध्यक्ष सचिन नलवडे,प्रशांत कांबळे, बापू दिवटे,समीर कबीर,अक्षय कांबळे,नंदकुमार नाळे, दादासो कुदळे,समाधान काळे,सावता कुदळे,संतोष काळे,नानासाहेब मोहोळकर आदींच्या सह्या आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या व्यापक हिताचा विचार करून ३लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज वाटप करण्याचे आदेश दिले आहेत परंतु,जवळ जवळ सर्वच बँका अनेक कारणे दाखवून शेतकऱ्यांना कर्ज वाटपासाठी टाळाटाळ करत आहेत.तरी प्रशासनाने सर्वच बँकाचा कर्जवाटपचा आढावा दर पंधरा दिवसानी घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यास बँकांना भाग पडावे.असे राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हाउपाध्यक्ष महेश काळे पाटील यांनी सांगीतले

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts