loader
Breaking News
Breaking News
Foto

सिना कोळगाव धरणग्रस्त संघटनेच्या मागणीस यश 'कंदील भेट' व 'धरणे 'आंदोलन स्थगित

करमाळा तालुक्यातील पूर्व भागांतील वीज पुरवठा सुरू केला आहे त्यामुळे दि.१५ जुलै रोजीचे धरणे आंदोलन व कंदील भेट आंदोलन तूर्त स्थगित केले आहे अशी माहिती सिना कोळगाव धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सतीश बापू नीळ यांनी चौफेर शी बोलताना दिली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

पुढे बोलताना श्री नीळ यांनी म्हटले आहे की, पूर्व भागात गेल्या सहा महिन्यांपासून सिंगल फेज व शेती सिंचन वीज पुरवठा फक्त चारच तास चालू होता म्हणून आम्ही वीज वितरण कंपनीच्या अधिकारी यांना वारंवारढे निवेदने देऊन आठ तास वीज पुरवठा सुरू व्हावा म्हणून सातत्याने प्रयत्न करत होतो, यापूर्वी ही शिवसेना ज्येष्ठ नेते शाहू दादा फरतडे यांनीही या मागणी साठी आंदोलन करू असे निवेदन सादर केले होते, व मागील आठ दिवसांपूर्वी शिवसेना नेते दिग्विजय भैय्या बागल यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकारी यांच्या बरोबर एक बैठक घेऊन वीज पुरवठा सुरू करावा यासाठी प्रयत्न केला होता. तरीही वीज वितरण कंपनीच्या अधिकारी यांनी तांत्रिक अडचणीमुळे वीज पुरवठा सुरू केला नव्हता त्यामुळे आम्ही सर्वच शेतकरी बांधव यांचे वतीने दि.१५/७/२०२१ रोजी वीज वितरण कंपनीच्या अधिकारी यांना कंदील भेट देऊन धरणे आंदोलन करू असे निवेदन दिले होते. त्यामुळेच वीज वितरण कंपनीच्या अधिकारी यांनी तात्काळ आमच्या मागणीचा विचार करून आज पासून सिंगल फेज लाईट चालू केली आहे व शेती पंपाची ही वीज आठ तास चालू केली आहे.

✍ चौफेर प्रतिनीधी

त्यामुळे आम्ही नियोजित पुकारलेले आंदोलन मागे घेतले आहे. असे श्री नीळ यांनी वीज वितरण कंपनी जेऊर यांना लेखी स्वरूपात कळविले आहे. यावेळी युवा सेना तालुका समन्वयक शंभुराजे फरतडे , , अतुल नीळ व्हॉईस चेअरमन निमगाव ह., राजेंद्र भोसले अध्यक्ष कर्मवीर मधुकरराव नीळ बहुउद्देशिय संस्था, हिवरे येथील माजी ग्रामपंचायत सदस्य अमोलदादा फरतडे, शरद पवार, दत्ता मामा साळुंके,व इतर सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts