loader
Breaking News
Breaking News
Foto

करमाळा आगारातील अनेक चालक वाहकांचे लसीकरण नाही ! लसीकरण कॅम्प आयोजित करण्याची मागणी

अनलॉकनंतर एसटी महामंडळाची प्रवासी वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे . त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. चालक-वाहकांना दररोज प्रवाशांच्या संपर्कात यावे लागते. त्यामुळे चालक वाहकांना संसर्गाचा तसेच त्यांच्याकडून देखील प्रवांना धोका आहे त्यामुळेच त्यांचे प्राधान्याने लसीकरण होणे अत्यावश्यक आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

करमाळा आगारात 325 कर्मचारी असुन 233 जणांचे लसीकरण झाले असून आणखी 92चालक-वाहक लसीच्या पहिल्या डोसच्या प्रतिक्षेत आहेत.45 वर्ष पुढील 102 कर्मचारी असून त्या पैकी94 जणांचे लसीकरण झाले आहे हि समाधानकारक बाब असली तरी इतर 92 जणांचे देखील लसीकरण होणे गरजेचे आहे त्या मुळे लसीकरण कॅम्प आयोजित करण्याची चालक वाहकांतुन मागणी होत आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

आगारातील चालक- वाहकांना निरनिराळ्या नियतांवर ड्युटी करत असताना बऱ्याच प्रवाशांशी संपर्क येत असतो. त्यामुळे कर्मचारी व प्रवाशी दोघांच्या सुरक्षिततेसाठी शंभर टक्के लसीकरण होणे आवश्यक आहे,लसीकरणासाठी मा मुख्याधिकारी विणा पवार व कुटिर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ अमोल डुकरे ,वैद्यकीय अधिकारी डाॅ सागर गायकवाड यांचे सहकार्यदेखील मिळाले आहे.इतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी आम्ही त्यांच्या संपर्कात असून चालक वाहकांसाठी लसीकरण कॅम्प आयोजित करावा असे आवाहन आगार प्रमुख अश्विनी किरगत यांनी केले आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts