दहिगाव योजनेच्या दुसऱ्या सुधारित प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाली असून जवळपास 342 कटी रुपये मंजूर झाले आहेत याची घोषणा केल्यानंतर आमदार. संजयमामा शिंदे यांनी माजी आ. नारायण पाटील यांच्यावर कडाडून टीका केली आहे नारायण पाटील यांनी दहिगाव साठी फुटक्या कवडीचा देखील निधी आणला नसून माजी मंत्री स्व दिंगबरराव बागल व माजी आमदार शामलताई बागल यांच्या कार्यालयात मंजूर झालेल्या निधिवरच दहिगाव चे काम केले आसा आरोप देखील आमदार शिंदे यांनी माजी आमदार नारायण पाटील यांच्यावर केला आहे .
नारायण पाटील स्वतः ला पाणीदार आमदार म्हणूऊन घेतात .परंतु या पाणीदार आमदाराने दहिगाव योजनेसाठी एक रुपयाचा निधी मंजूर केला नसल्याची माहिती आ. शिंदे यांनी दिली. कै. दिगंबरराव बागल यांच्या कार्यकाळामध्ये दहीगाव योजनेला मूळ प्रशासकीय मान्यता मिळून 57.66 कोटीची तरतूद करण्यात आली होती.हा निधी संपल्यानंतर 2009 साली सौ. शामलताई बागल या आमदार असताना पहिली प्रशासकीय मान्यता 178 . 99 कोटींची मिळाली. या मंजूर निधी मधूनच माजी आमदार नारायण पाटील यांनी दहिगाव योजनेची कामे केली. 2017 साली हा निधी संपल्यानंतर दुसरा सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर होणे आवश्यक होते .परंतु पाटील यांच्या कार्यकाळातमध्ये हा प्रस्ताव सादर झाला नाही. या कडेही संजय शिंदे यांनी लक्ष वेधले आहे
जानेवारी 2020 पासून दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी आपण शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला आणि त्याचे फलित म्हणून जुलै 2021 मध्ये दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी 342.30 कोटी चां प्रस्ताव मंजूर झाला .या योजनेच्या संपूर्ण वाटचालीमध्ये माजी आ.पाटील यांनी कुठेही एक रुपया निधी मंजूर केल्याचा दिसत नाही. तरीही ते स्वतःला पाणीदार आमदार म्हणून घेतात हा विरोधाभास असल्याचे आमदार शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.