loader
Breaking News
Breaking News
Foto

दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या साठी दुसर्‍या सुधारीत प्रस्तावास मंजुरी ,मिळणार 342 कोटी - आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती

करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाला वरदायिनी ठरलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या दुसऱ्या सुधारित प्रस्तावास आज प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती करमाळ्याचे आ.संजयमामा शिंदे यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांचे अध्यक्षतेखाली आज अग्रक्रम समितीची बैठक मा. उपमुख्यमंत्री यांच्या दालनात संपन्न झाली.या बैठकीमध्ये दहिगाव योजनेच्या 342 . 30 कोटी किमतीच्या दुसऱ्या सुधारित प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाली.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

दहिगाव उपसा सिंचन योजनेला मूळ प्रशासकीय मान्यता 1996 सली 57 . 66 कोटींची मिळाली होती. त्यानंतर पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता 2009 साली 178 . 99 कोटींची मिळाली होती. सदर निधी 20 16 - 17 साली संपल्याने योजनेचे काम बंद होते .दरम्यान 2019 ला आपण आमदार झाल्यानंतर या योजनेला दुसरी प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार आज या प्रस्तावास ३४२.३० कोटींची मान्यता देण्यासाठी अग्रक्रम समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये मंजुरीचा निर्णय झाला असल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून 24 गावातील एकूण 10 हजार 500 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. सदर निधी मंजूर झाल्यामुळे योजनेची उर्वरित कामे पूर्ण होऊन सर्व गावांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळू शकेल .तसेच मुख्य कॅनॉलचे अस्तरीकरण , पूलांची अपूर्ण कामे , पोट चारी व उपचार यांची कामे या निधीमधून अग्रक्रमाने पूर्ण केली जातील असे आमदार संजय शिंदे यांनी जाहीर केले

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts