loader
Breaking News
Breaking News
Foto

नेतेमंडळींच्या गरमागरम वक्तव्यांने ऐन पावसाळ्यात शहरातील राजकीय वातावरण तापले, निवडणूकां आगोदरच रणधुमाळी सुरु

करमाळा नगर पालीकेची निवडणूक काही महिन्यांवर येवुन ठेपली आहे मात्र नेते मंडळींकडून आता पासूनच वातावरण तापवायला सुरवात झाली आहे ,रिमझिम पावसाचा मोसम असताना नेतेमंडळीच्या गरमागरम वक्तव्यांने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे .बागल गटाचे नगरसेवक सचिन घोलप यांनी जयवंतराव जगताप यांच्या नावाने नव्याने तयार झालेल्या व्यापारी संकुलाचा फोटो सह भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणुन वात पेटवली आहे त्यांनंतर बागल गटाचे नगरसेवक व विरोधी पक्ष नेते कांबळे यांनी थेट नगराध्यक्ष जगताप यांचे कौतुक केल्याने खळबळ उडाली होती.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या वादात नगरसेवक आल्ताफ तांबोळी यांनी उडी घेऊन थेट नगराध्यक्ष वैभराजे जगताप यांनाच टार्गेट करत वॉर्डात उभे राहुन निवडणूक जिंकण्याची कुवत नाही असे म्हणुन थेट आव्हान दिले होते .

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

आल्ताफ यांची टिका जिव्हारी लागल्यानंतर स्वत: वैभव जगताप यांनी या टिकेला उत्तर दिले असुन दोन नंबर धंदेवाल्यांनी आम्हाला शिकवु नये ,गुटख्याच्ये धंद्यात पाचशे कोटी कमवले आहेत तुमची लायकी काय आहे ते सर्वांना ठावूक आहे , बागल गट तिसऱ्या क्रमांकावर का गेला ते आधी पहा असे उत्तर दिले आहे तर जगताप यांच्या टिकेनंतर लागलीच नगरसेवक सचिन घोलप यांनी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्यावर पलटवार केला असुन गाड्यावरुन फुकटात वडापाव उचलुण खाणाऱ्यांनी आम्हाला शिकवु नये ,बागल गट तिसऱ्या क्रमांकावर गेला असे म्हणणार्‍यांनी जयवंतराव जगताप यांचे दोन वेळा डिपॉझिट जप्त झाले व तिसऱ्या वेळेस होवु नये म्हणुन निवडणूकीतुन का पळ काढला ?ते आगोदर सांगावे आशी खरमरीत टिका केली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

ऐन पावसाळ्यात नेतेमंडळी कडुन सुरु असलेल्या पत्रक बाजी मुळे राजकीय वातावरण तापले असुन शहरवासीय या दुहेरी वातावरणाचा आनंद लुटत आहेत

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts