loader
Breaking News
Breaking News
Foto

डाॅ प्रशांत सुराणा यांच्या कडून चिखलठाण ग्रामपंचायतला इसिजी मशीन सप्रेम भेट

चिखलठाण येथील सुराणा परिवार सामाजिक कार्यात नेहमीच भरीव योगदान देत आले आहे ,शाळेसाठीची इमारत संरक्षण भिंत तसेच आरोग्य शिबीर, वृषारोपन तसेच इतर सामाजिक कार्यात या परिवाराचे भरीव योगदान राहिले आहे,आज चिखलठाण ग्रामस्थांसाठी इसीजी मशीन भेट देऊन पुन्हा एकदा सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

उपसभापती पै .दत्ता सरडे ,सरपंच चंद्रकांत सरडे ,माजी उपाध्यक्ष जि प उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, आदिनाथ चे माजी व्हा चेअरमन केरु गव्हाणे, माजी उपसरपंच दिनकर सरडे ,माजी ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र सरडे ,नवनाथ सरडे,शिवलालशेठ सुराणा,पोपटलाल सुराणा, डाॅ बारकुंड डाॅ पवार, युवक अध्यक्ष अक्षय सरडे आरोग्य सेवीका कदम मॅडम आशा वर्कर पोळ ग्रामसेवक घाडगे भाऊसाहेब दत्ता सरडे गौतम पवार ऐड दिंगबरराव शंकर ,दशरथ राऊत यांच्या उपस्थितीत इसीजी मशीन भेट देण्याचा कार्यक्रम पार पडला. सध्या नागरीकांना छातीत दुखणे,ब्लड प्रेशर वाढणे अशा समस्या वाढल्या आहेत आशा रुग्णांना गावातच ईसीजी मशीन असेल तर लगेच तपासणी करून पुढील उपचार करणे सोपे जाईल तसेच खासगी रुग्णालयात इसीजी काढण्यासाठी तिनशे ते चारशे रुपयांपर्यंत लागणारा खर्च देखील वाचावा या उद्देशाने डाॅ प्रशांत सुराणा यांनी आज ग्रामस्थांसाठी इसीजी मशीन भेट दिली आहे .उपकेंद्रातील आरोग्य सेवीका व वैद्यकीय अधीकारी या मशीन मार्फत गरजु रुग्णांची मोफत तपासणी करणार आहेत असे डाॅ सुराणा यांनी सांगीतले या वेळी.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

या वेळी बोलाताना उपसभाती पै दत्ता सरडे म्हणाले की कोणतेही सामाजिक कार्य करायचे म्हटले तर "पैशाने श्रीमंत असुन चालत नाही तर मनाने देखील श्रीमंत" असणे गरजेचे आहे व ती श्रीमंती सुराणा परीवाराने टिकवली आहे असे मत व्यक्त केले . सरपंच चंद्रकांत सरडे म्हणाले की सुराणा परिवार नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतो ,इतरांनी देखील त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन लोकोपयोगी काम करण्यास प्राधान्य द्यावे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

सुराणा परिवाराच्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts