loader
Breaking News
Breaking News
Foto

हनुमंत मांढरे पाटील यांनी घेतली गृहमंत्री वळसे पाटील यांची भेट,केली ही मागणी

राष्ट्रावादी काँग्रेस चे तालुका कार्याध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मंत्रालय येथे भेट घेतली असून या भेटीत पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडल्या असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या बाबत अधीक माहिती देताना मांढरे पाटील म्हणालः की पोलीस कर्मचारी यांची कैफियत थेट गृहमंत्र्या समोर मांडलीअसुन कायदा व सुव्यवस्था बिघडू नये तो अबाधित कसा राहिल या साठी रात्र दिवस काम करणारे सर्व सामान्य नागरिक सुरक्षित कसा राहिल या काम करणारे करमाळा तालुक्यातील पोलीस कर्मचारी आज यांचीच कुटूंब सुरक्षित नाहीत या मुद्द्यावर मी भेट घेतली असून पोलीस कर्मचारी यांच्या निवासी वसहातीची अवस्था हि अत्यंत वाईट झालेली आसून हि वसहात पूर्णपणे मोडकळीस आलेली आहे परंतु तरी देखील नाइलाजास्तव पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी जीव मुठीत धरून आपल्या कुटुंबा सह लहान लहान मुलांना घेऊन त्या ठिकाणी वास्तव्य करीत आहे आता पावसाळ्यात तर संपूर्ण वसाहत गळते आहे त्यामुळे सामान्य जनतेच्या सुरक्षिततेची काळजी घेणारे अहोरात्र काम करणारे पोलीस बांधव यांचे कुटुंबिय सुरक्षित नसल्याचे निदर्शनास आणून नवीन वसाहतीच्या बांधणीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा आशी मागणी केल्याचे मांढरे पाटील यांनी सांगीतले आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

लवकरच या प्रश्नाचे गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करू आसे आश्वासन गृहमंत्री वळसे पाटील यांनी मांढरे यांना दिले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

पोलिस बांधवांचा महत्वपूर्ण प्रश्न मांडल्याबद्दल मांढरे यांचे पोलिस कर्मचार्‍यांकडून कौतुक होत आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts