करमाळा पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यापासून सभापती पदावर अतुल पाटील यांचीच वर्णी लागणार आशी चर्चा सुरु झाली होती , दहा सदस्य संख्या असलेल्या या सभागृहात पाटील गटाकडे नऊ सदस्यांचा पाटिंबा होता मात्र ऐकमेव पंचायत समीती सदस्य राहुल सावंत यांनी वेळेत नोटीस न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित करून सभापती निवडीवर स्थगिती आणल्याने या निवडीला वेगळे वळण मिळाले होते.
1 जुलै रोजी सभापती पदाचा अर्ज भरण्याची वेळ संपल्यानंतर ऐकमेव अतुल पाटील यांचा अर्ज आल्याने पाटील बिनविरोध सभापती होतील हे गृहीत धरुन पाटील गटाकडून जल्लोष साजरा केला गेला मात्र सावंत यांच्या भुमिकेमुळे या हा जल्लोष फार काळ टिकला नव्हता.
तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी समिर माने यांनी 9 जुलै रोजी सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर राहुल सावंत यांनी 9जुलै रोजी सभापती निवडीत चमत्कार करु अशी गर्जना केली होती .मात्र आज संजय शिंदे समर्थक राहुल सावंत यांना कोणताही चमत्कार करता आला नाही आज देखील सर्व सदस्य पाटील यांच्या बाजुने उभे राहिले त्या मुळे पुन्हा एकदा अतुल पाटील बिनविरोध सभापती पदावर विराजमान झाले." राहुल सावंत यांची चमत्कार करु हि घोषणा म्हणजे फक्त हवेत केलेला गोळीबार होता" आशी चर्चा दिवसभर पंचायत समिती परिसरात सुरु होती.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.