loader
Breaking News
Breaking News
Foto

पंचायत समिती सभापती पदी पै अतूल पाटील बिनविरोध! औपचारिक घोषणा बाकी, मात्र आज जल्लोष नाही.

पंचायत समीती सदस्य एडव्होकोट राहुल सावंत यांनी वेळेत नोटीस न मिळाल्याची तक्रार करत रद्द केलेली 1जुलै रोजीची सभापती पदाची निवड अपेक्षे प्रमाणे आज देखील बिनविरोध होणार असल्याचे नक्की झाले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

1 जुलै रोजी रद्द झालेला निवडणूक कार्यक्रम 9 जुलै रोजी घेण्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार समिर माने यांनी जाहीर केले होते या अनुषंगाने आज सकाळी दहा वाजल्यापासून बारा वाजेपर्यंतच सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्यास मुदत होती मात्र बारा वाजेपर्यंत एकमेव सदस्य अतुल पाटील यांचाच अर्ज दाखल झाला असल्याने अतुल पाटील यांचा बिनविरोध सभापती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे .मात्र 1 जुलै रोजी बारा वाजल्यापासून जल्लोष करण्यास सुरवात झाली होती आज मात्र तेवढा उत्साह अजुन दिसुन आलेला नाही.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

दरम्यान पंचायत समती कार्यालयात विद्यमान सभापती गहिनीनाथ ननवरे,उपसभापती पै दत्तात्रय सरडे जिल्हापरिषद सदस्य, बिभिषण आवटे, माजी आमदार नारायण पाटील यांचे चिरंजीव युवा नेते पृथ्वीराज पाटील प्रा सरक सर युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड ठाण मांडून बसले आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

मात्र दुपारी दोन नंतर मोठ्या प्रमाणात जल्लोष होण्याची शक्यता असुन अनुचित प्रकार घडु नये यासाठी पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts