loader
Breaking News
Breaking News
Foto

सभापती निवडी कडे तालुक्याचे लक्ष,दोन वाजता होणार फैसला !

करमाळा पंचायत समितीचे विद्यमान सभापती गहिनीनाथ ननवरे यांनी राजीनामा दिल्यानंतर 25 जुन रोजी सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला होता त्यानुसार 1 जुलै रोजी नारायण पाटील गटाचे पै अतुल पाटील यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केला होता, अर्ज भरण्याची वेळ संपेपर्यंत अतुल पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने हि निवड बिनविरोध पार पडली होती दहा पैकी 9 सदस्यांचा अतुल पाटील यांना पाठींबा होता.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

सभापती निवडीची नोटीस वेळेत मिळाली नसल्याची तक्रार पंचायत समिती सदस्य राहुल सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याने ऐनवेळेस निवडीस स्थगिती देण्यात आली होती .एकमेव अर्ज दाखल असल्याने अतुल पाटील हे बिनविरोध सभापती जाहीर होण्यास औपचारिक घोषणा बाकी असल्याने पाटील गटाकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता, मात्र ऐनवेळेस निवडणूक कार्यक्रम रद्द झाल्याने पाटील गटाच्या आनंदावर विरजण पडले होते.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

जुलै रोजीचा निवडणुक कार्यक्रम रद्द झाल्यांनतर निवडणूक अधिकारी तहसीलदार समिर माने यांनी त्याच दिवशी 9 जुलै हि तारीख जाहीर केली होती त्यानुसार आज दहा वाजल्यापासून अर्ज भरण्यास सुरवात होणार आहे दुपारी बारापर्यंत अर्ज भरण्याची अंतिम वेळ असणार आहे त्यांनतर छाननी व दुपारी दोन वाजता निवड जाहीर होणार आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

सभापती निवडीवर अक्षेप घेतलेले राहुल सावंत यांनी 9 जुलैला आम्ही चमत्कार करु असा दावा केला आहे ,मात्र त्या दुष्टीने सावंत गटाकडून कोणतेही पाऊल उचलले गेल्याचे पहावयास मिळाले नाही ,सर्व 9 सदस्यांचा अतुल पाटील यांनाच पाटिंबा असल्याची खात्रीशीर माहिती असून तेच बिनविरोध सभापतीपदी विराजमान होतील अशी चर्चा आहे तरी देखील विरोधास विरोध म्हणून सावंत अर्ज दाखल करण्याचे धाडस करणार का? सावंत हे केलेल्या दाव्या नुसार खरेच चमत्कार करणार का? या कडे तालुक्याचे लक्ष लागले आहे .

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts