कोरोना नंतर जनजीवन पूर्वपदावर येत आहे , त्यामुळे जिल्हाबंदी हटवल्या नंतर लांब पल्ल्यांच्या बससेवा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवांशाची सोय व्हावी या करता ग्रामीण भागात देखील बससेवा पूर्ववत करण्यासाठी करमाळा आगार प्रयत्नशील असुन प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्यास पुर्वीच्या वेळा पत्रका नुसार सर्व स्थानिक फेऱ्या सुरु करु आशी माहती करमाळा आगाराच्या आगार प्रमुख अश्विनी किरगत यांनी चौफेर शी बोलताना दिली आहे.
या वेळी अधीक बोलताना किरगत म्हणाल्या की राज्य परिवहन करमाळा आगारने लांब पल्ल्याच्या मुंबई , बोरिवली, नाशिक इत्यादी मार्गावर बसेस सुरू केल्या आहेत. तसेच मध्यम लांब पल्ला च्या पुणे, लातूर, अक्कलकोट या बसेस सुरू केल्या आहेत.या बसेस ना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. परंतु पुणे मुंबई वरून परत आलेल्या प्रवाशाना करमाळ्यातून स्वतःच्या गावी जाणे गैरसोयीचे होत होते. तसेच ग्रामीण भागातील जनतेला करमाळा शहरात येणे जाणे सोपे व्हावे यासाठी ग्रामीण भागातील बस सेवा सूरु करण्यात येत आहे.
या मध्ये शेळगाव, आवाटी, कर्जत, जामखेड, बार्शी, चिखलठाण,केतूर, या गावातील मुक्कामी बसेस सुरू झाल्या आहेत. तसेच नागरिकांच्या मागणीनुसार इतर मुक्कामी बसेस देखील सुरू करण्यात येतील. प्रवाशांनी पुणे, मुंबई, बोरिवली मार्गांवर जसा उदंड प्रतिसाद ब्रेक द चैन नंतर दिला आहे तसाच प्रतिसाद देऊन या ग्रामीण भागातील बस सेवेचा देखील लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक अश्विनी किरगत यांनी केले आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.