loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्ह्यातील सातशे शाळेचा वाजणार घंटा!या असणार अटी शर्ती, सरपंच व ग्रामस्तरीय समितीवर जबाबदारी

कोरोनामुक्त ठरलेल्या गावात राज्य शासनाने आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील सातशे कोरोनामुक्त गावात शाळेची घंटा वाजविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत सर्वस्वी जबाबदारी मात्र शासनाने सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या ग्रामस्तरीय समितीवर सोपविण्यात आली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

कोरोना परिस्थितीमुळे सलग दोन शैक्षणिक वर्षात शाळेचीघंटा वाजलीच नाही. या दरम्यान केवळ ऑनलाईप्रणालीने मुलांचा अभ्यासक्रम पुर्ण करण्यात आला. त्यांना पुढील शैक्षणिक वर्षात परीक्षान घेताच प्रवेश देण्यात आला. नव्या शैक्षणिक वर्षात शाळा कधी सुरु होणार याची उत्सुकता पालकांतहोती. राज्य शासनाने बुधवारी अखेर स्वंतत्र शासन निर्णय प्रसिध्द करुन कोरोनामुक्त झालेल्या गावात शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

एक जरी विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळल्यास शाळा बंद करा कोरोनामुक्त झालेल्या गावात शाळा सुरु करण्यासंदर्भात राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना लेखी स्वरुपात शिक्षण खात्यास दिले आहेत. त्यानुसार ज्या गावातील शाळा सुरु करायची आहे, त्या गावात किमान एक महिन्यापुर्वी गावात एकही कोरोना रुग्ण नसावा. तरच शाळा सुरु करता येईल, असे शासनाने स्पष्ट केले आहे. शाळा सुरु झाल्यानंतर एक जरी विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आल्यास तातडीने सर्व विद्यार्थ्यांचे अलगीकरण करुन शाळा बंद करण्यात यावे. विद्यार्थी व शिक्षकांवर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यात यावेत असेही आदेश राज्य शासनाने दिले आहेत

✍ चौफेर प्रतिनीधी (सोलापूर)

शाळा सुरु करण्यासाठी शिक्षकांचे कोरोना चाचणी करणे, त्यांचे लसीकरण करणे व शाळेचे सॅनीटायझर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.कोरोनामुक्त झालेल्या गावात शाळा सुरु केल्यानंतर शिक्षकांची राहण्याची व्यवस्था त्याच ठिकाणी किंवा परिसरात करण्यात यावी.शिक्षक कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक प्रवासी सेवेतून प्रवास करणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी असेही आदेश राज्य शासनाने दिले आहेत. राज्य शासनाच्या शासन निर्णयानुसार कोरोनामुक्त झालेल्या गावात शाळा सुरु करण्यासंदर्भातचे नियोजन जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडून सुरु करण्यात आले आहे. राज्य शासनाने घालून दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आदेश शाळांना देण्यात येत आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts