loader
Breaking News
Breaking News
Foto

माझे महाविद्यालय माझे झाडं या योजनेचा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शुभारंभ

वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती या तुकाराम महाराजाच्या या उक्तीनुसार करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा या महाविद्यालयात माझे महाविद्यालय माझे झाड या योजनेचा शुभारंभ झाला.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

ही योजना विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी. पाटील , उपप्राचार्य, लेफ्टनंट संभाजीराव किर्दाक यांच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालयात या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. करमाळा येथील प्रसिद्ध कापड व्यापारी पप्पूशेठ सिंधी , संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, रिपेश कटारिया , श्री.संजय दिवाण , उपप्राचार्य लेफ्टनंट संभाजीराव किर्दाक, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख , श्री. संजय साळुंखे , श्री अशोक फुटाणे व लिडस् स्कूलचा विद्यार्थी सार्थक साळुंखे यांच्या उपस्थितीमध्ये महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर वडाचे झाड लावून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

माझे महाविद्यालय माझे झाड या योजनेमध्ये कार्यालयीन कर्मचारी श्री.संजय साळुंखे यांनी सुरुवात केली असून, ते या योजनेसाठी 100 झाडे व 03 बंडल ठिंबकचे देणार आहेत. तसेच या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांनी यशवंत परिवारातील सदस्यांनी या योजनेत स्वइच्छेने सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन केले . तसेच या योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या 26 एकराच्या परिसरात विविध देशी झाडांची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे. भविष्यकाळात महाविद्यालयाचा हा परिसर वृक्षवेलींनी व फुलझाडांनी नटलेला दिसेल असे सांगितले. तसेच श्री.पप्पूशेठ सिंधी व श्री. रितेश कटारिया यांनी या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात टी गार्ड देण्याचे आश्वासन दिले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या वेळी यशवंत परिवाराचे सर्व सदस्य उपस्थित होते

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts