loader
Breaking News
Breaking News
Foto

पुलावरुन दुचाकी पडुन युवकांचा मृत्यु ,दुसर्‍या दिवशी मृतदेह सापडला!कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची शिवसेनेची मागणी

सालसे कुर्डूवाडी रोडवर वरकुटे गावापासून अंदाजे 2 किलोमीटर अंतरावर रस्त्यावरील पुलाखाली दुचाकी पडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.सोमनाथ खराडे वय (३५ )असे दुचाकीस्वाराचे नाव तो फिसरे तालुका करमाळा येथील रहिवाशी होता.   खराडे हे असून गुरुवारी रात्रीच्या सुमारास कव्हे ता.माढा येथून आपल्या फिसरे गावी येत असताना पुलाच्या कामाचा आंदाज न आल्याने दुचाकी सह पुलावरून आत कोसळले सदर पुलाचे काम सुरु असताना या ठिकाणी बॅरीकेट किंवा सुचनाफलक लावले नाहीत फलक आसते तर कदाचित हा अपघात घडला नसता मात्र ठेकेदाराच्या हालगर्जी पणा मुळे हा आपघात झाला असून ठेकेदार कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत आवताडे व फिसरे येथील सरपंच प्रदिप दौंडे यांनी केली आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

पुलामध्ये पाणी साचल्याने रात्रीपासून दुचाकी व दुचाकीस्वार पाण्यात बुडाल्याने कोणालाही याची माहिती मिळाली नाही. जेंव्हा आज शुक्रवारी दुपारी पुलाच्या कामासाठी पाणी काढले तेंव्हा ही घटना उघडकीस आली.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

मयत सोमनाथ खराडे हे अत्यंत गरीब कुटुंबातील असल्याने त्यांच्या पश्चात असणाऱ्या त्यांची पत्नी व तीन लहान-लहान मुलं उघड्यावर पडली असुन त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

कुटीर रूग्णालय येथे मयत व्यक्तीचा पंचनामा सुरु असुन जो पर्यंत कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही व खराडे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळत नाही तो पर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही असा इशारा दिला.शिवसेनेच्या वतीने दिला आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts