करमाळा तालुक्याच्या राजकारणात कधी काय होईल हे शेवटपर्यंत सांगणे कठीण आहे याचा प्रत्यय तालुक्यातील नागरीकांनी अनेक वेळा घेतला आहे म्हणून जो करमाळ्याचे राजकारण शिकला तो राज्यात कुठे नापास होणार नाही असे नेतेमंडळी अधुन मधुन बोलत असतात .2014 च्या विधान सभा निवडणुकीत रश्मी बागल विजयाच्या उंबरठ्यावर असताना पोस्टल मतमोजणीस आक्षेप घेतला गेला .वर्ग एकच्या अधिकाऱ्यांनी पोस्टल मतांवर सत्यप्रत करणे अवश्यक असताना एकाच मुख्याध्यापकाच्या सहिने सत्यप्रत केल्याचा मुद्दा उपस्थित करुन अक्षेप घेतल्याने नारायण पाटील 252 मतांनी विजयी झाले होते ,पुढे हे प्रकरण न्यायालयात देखील गेले होते व पाच वर्षे चर्चेत होते.विशेष म्हणजे राज्यभर मुख्याध्यापक यांची सत्यप्रत ग्राह्य धरली होती.ति पोस्टल मते मोजली असती तर बागल विजयी झाल्या असत्या असे देखील बोलले जात होते.
बाजार समितीच्या इतिहासात शेतकऱ्यांना मतांचा आधिकार प्राप्त झाल्यानंतर पहिल्यांदाच झाल्येल्या निवडणुकीत नारायण पाटील व जयवंतराव जगताप हे युती करुन तर रश्मी बागल व संजय शिंदे हे स्वतंत्र पॅनेल करुन मैदानात उतरले होते. या वेळी बागल गटाने आठ जागांवर विजय मिळवला होता तर शिंदे /सावंत गटाला दोन जागा मिळाल्या होत्या तर तर पाटील /जगताप युतीला देखील आठच जागा मिळाल्या होत्या मात्र यात स्वत: जगताप हे दोनजागेवर विजयी झाल्याने नियमानुसार पाटील जगताप यांच्याकडे सातच मते राहणार होती ,दोन जागा जिंकलेले सावंत व शिंदे यांच्या हाती सत्तेच्या चाव्या आल्याचे बोलले जात होते व जयवंतराव जगताप हेच सभापती होणार अशीच सर्वांना खात्री होती ,मात्र ऐनवेळेस नारायण पाटील यांचे कट्टर समर्थक प्रा शिवाजीराव बंडगर यांनी कोणाच्याही ध्यानी मनी नसताना ऐनवेळी बागल गटाकडून सभापतीपदासाठी अर्ज दाखल केल्याने राजकीय भूकंप झाला होता, व हे प्रकरण मारामारी पर्यंत गेले होते. या घटनेचे पडसाद आज देखील राजकीय घडामोडींत उमटत आहेत.याचा प्रत्यय काल झालेल्या बाजार समितीच्या सचिव पदाच्या निडीत दिसुन आला ,बागल गटाकडून निवडणूक जिंकलेले संतोष वारे व सुभाष गुळवे गैरहजर राहुन देखील सचिव निवडीच्या ठरावास समसमान मते मिळाली व सभापतीच्या अधिकारातील मताचा वापर करुन बागल गटाने हा ठराव जिंकला व सचिव क्षीरसागर यांच्या ऐवजी पाटणे यांना सचिव केले आहे ,मात्र यावर देखील जगताप गटाकडून न्यायालयात जाण्याची तयारी सुरु आहे. आज करमाळा पंचायत समितीतीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत पंचायत समीती सभापती पदांची निवड प्रकिया सुरु होती दुपारी बारापर्यंत एकमेव उमेदवार अतुल पाटील यांचाच उमेदवारी अर्ज आल्याने हि निवड बिनविरोध जाहीर झाल्यात जमा होती दहा पैकी नऊ सदस्य प्रत्यक्षात अतुल पाटील यांच्यासोबत होते, दोन वाजता निवडणुक अधिकारी औपचारिक घोषणा करतील हे गृहीत धरूनच पाटील गटाकडून आनंदोत्सव सुरु झाला होता ,हार तुरे, हालग्यांचा कडकडाट होत होता .सत्कार कार्यक्रमात सभापती अतुल पाटील दंग होते. राहुल सावंत यांचा देखील आपल्याला विरोध नाही दहा ची दहा सदस्य आपल्या बाजुने आहेत असे अतुल पाटील सांगत होते! अधिकृत पत्र घेण्यासाठी जेऊर मधुन माजी आमदार नारायण पाटील यांची गाडी निघाली देखील होती ,मात्र इतक्यात पोथरे गणाचे सदस्य तथा एडव्होकोट राहुल सावंत यांनी कायदेशीर बाबींचा मुद्दा उपस्थित करून या निवडीलाच स्थगिती आणली आणी ऐकून परस्थीतीचा नुरच बदलला.
निवडणुकी आगोदर सात दिवस सदस्यांना नोटीस पोहचली पाहीजे आसा नियम आहे मात्र राहुल सावंत यांना चार दिवस आगोदर नोटीस पोहोचली या मुद्द्यावरून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांडे तक्रार नोंदवली जिल्हाधिकाऱ्यांकडून या निवडीला स्थगिती देण्याचा आदेश निवडणूक आधिकारी समीर माने यांना दिल्याने सभापती निवड नऊ जुलैपर्यंत लांबणीवर पडली आहे. याबाबत निवडणूक आधिकारी समीर माने यांच्याकडून एकुण प्रकरणाची माहिती पत्रकारांनी घेतली असता आमचे कर्मचारी राहुल सावंत यांना शुक्रवार दिनांक २५ रोजीच नोटीस देण्यासाठी गेले होते मात्र सावंत हे वैद्यकीय कारणांसाठी बाहेरगावी गेले होते ,त्यानंतर शनिवार रविवार सुट्टी असल्याने सावंत यांना नोटीस पोहचली नाही यात प्रशासनाचा कोणताही दोष नाही ,आम्ही नव्याने पुन्हा सर्वांना नोटीसा काढणार आहोत जर कोणी नोटीस नाही घेतली तर त्यांच्या घराला नोटीस चिटकवून पंचनामा केला जाईल व नऊ जुलै रोजी पुन्हा सभापती निवडीचा कार्यक्रम घेणार असल्याचे सांगीतले. या वेळी अतुल पाटील यांचे मत पत्रकारांनी जाणुन घेतले असता ते म्हणाले की, राहुल सावंत यांच्या भुमिकेवर आज काही प्रतिक्रिया देणे योग्य नाही मात्र ठामपणे सांगतो की नऊ जुलै रोजी माजी आमदार नारायण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा सभापती पदी विराजमान होवु
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.