loader
Breaking News
Breaking News
Foto

पंचायत समिती सभापती पदी पै अतूल पाटील बिनविरोध! औपचारिक घोषणा बाकी

करमाळा पंचायत समितीचे विद्यमान सभापती पदी गहिनीनाथ ननवरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर पाटील गटाचे पै.अतुल पाटील यांची सभापती पदी निवड होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

दहा सदस्य संख्या असलेल्या पंचायत समितीत सात सदस्यांचा पाटील यांना पाठींबा असल्याची खात्रीशीर माहिती विरोधकांना आगोदरच लागली होती त्यामुळे अर्ज भरण्यांची तसदी विरोधकांकडून घेतली नाही .अर्ज भरण्याची मुदत बारा वाजेपर्यंतच होती ती संपून गेली अल्याने सभापती पदी डबल उपमहाराष्ट्र केसरी पै अतूल पाटील यांनी बिनविरोध बाजी मारली आहे .अधिकृत घोषणेला मात्र दोन वाजेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

पाटील यांच्या समर्थकातून सोशल मिडीयावर अभिनंदनाच्या पोस्ट चार दिवसांपासुन झळकत होत्या . बिनविरोध झाल्याचे समजताच कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरु झाला आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

अतुल पाटील हे शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांचे समर्थक व पुतणे असल्याने त्यांच्या रुपाने पंचायत समितीतीवर पुन्हा एकदा भगवा फडकला आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts