करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सुनील शिंदे हे निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी माजी सभापती जयवंतराव जगताप यांचे कट्टर समर्थक विठ्ठल क्षीरसागर यांची सेवाज्येष्ठतेनुसार निवड झाली होती .यावर सभापतीचा आदेश डावलुन मावळते सचिव सुनील शिंदे यांनी बेकायदेशीर विठ्ठल शिरसागर यांची निवड केली आहे अशी तक्रार सभापती शिवाजीराव बंडगर यांनी राज्य पनण संचालकाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत पणन संचालक सतीश सोनी यांनी जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांना बाजार समितीचे नियंत्रक अधिकारी म्हणून योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी बंडगर यांनी सभेच्या प्रभारी सचिवपदाचा निर्णय घेण्यासाठी मंगळवार, दि. २९ जून रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा उपनिबंधक श्री कुंदन भोळे यांच्या निरीक्षणात संचालक मंडळाची सभा बाजार समितीच्या सभागृहात बोलावली होती.
सभेचे अध्यक्ष श्री. बंडगर यांनी सचिव पदासाठी श्री. राजेंद्र पाटणे यांचे नाव सुचविले असता त्याला जगताप गटाकडून विरोध करण्यात आला त्यामुळे सदर निवडी साठी मतदान करण्याचे ठरले असता जगताप गटाकडून ८ व बागल गटाकडून ८ संचालकांनी मतदान केले.दोन्ही बाजुने समसमान मते पडल्याने यात सभापती प्रा. शिवाजी बंडगर यांनी आपल्या आधिकारात असलेले निर्णायक मत पाटणे यांच्या बाजुने दिल्याने त्याची सचिव पदी नेमणूक करण्याचा ठराव पास करण्यात आला, या घडामोडीत गत सभापती निवडी वेळी जगताप यांच्या बाजुने असलले सावंत गटाचे वालचंद रोडगे हे बागल गटाच्या बाजुने राहिल्याने सावंताच्या मदतीने बागल गटाने बाजी मारली आहे असे चित्र निर्माण झाले.दरम्यान जगताप गटाकडून या निवडीस आवाहन देण्याची तयारी असुन सेवाजेष्ठतेने पदभार स्विकारलेले क्षीरसागर यांनी मी पणन संचालक यांचेकडे दाखल केलेले अपील प्रलंबीत असून सदरची बाब न्याय प्रविष्ठ आहे व आजचा संचालक मंडळाचा काठावरील ठराव हा बेकायदेशीर असून महाराष्ट्र कृषी उत्पन्न (विकास व विनीयमन ) १९६३, नियम १९६७, मंजूर उपविधी व कर्मचारी सेवा नियमांचा भंग करणारे असल्याने अपिलात जाणार व चार्ज देणार नसत्याचे क्षीरसागर यांनी सांगीतले आहे .दोन्ही बाजुने दावे प्रतीदावे करण्यात येत असल्याने सचिव नेमका कोणाचा असणार याचीच चर्चा सुरु आहे.
ठरावाच्या बाजूने दिग्विजय बागल, सभापती प्रा. शिवाजी बंडगर उपसभापती चिंतामणी जगताप, आनंद ढेरे, वालचंद रोडगे, सरस्वती केकाण, रंगनाथ शिंदे,अमोल झाकणे यांनी तर ठरावाच्या विरोधात जयवंतराव जगताप, चंद्रकांत सरडे, सदाशिव पाटील, दत्तात्रय रणसिंग, शैला लबडे, विजय गुगळे, मयूर दोशी, औदुंबर मोरे यांनी मतदान केले .
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.