loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंत -पाटील भेटीने राजकीय चर्चेला उधाण !

विहाळ ता करमाळा येथील भैरवनाथ शुगर च्या कार्यालयात शिवसेना जिल्हा समन्वयक प्रा शिवाजीराव सावंत व शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांच्यात भेट झाल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे . गत विधान सभा निवडणुकीत नारायण पाटील शिवसेनेचे विद्यमान आमदार असताना पाटील यांचा पत्ता कट करुन रश्मी बागल यांना शिवसेनेत प्रवेश देवुन उमेदवारी देण्यात संपर्क प्रमुख तानाजीराव सावंत व जिल्हा समन्वयक शिवाजीराव सावंत यांची भुमीका महत्वपूर्ण ठरली होती .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या रश्मी बागल या तिसऱ्या क्रमांकावर गेल्या होत्या तर बंडखोरी करून अपक्ष लढलेले नारायण पाटील मात्र दुसर्‍या क्रमांकावर राहिले होते.पाटील यांना सेनेची ऊमेदवारी असती तर चित्र वेगळे दिसले आसते आशी चर्चा त्यावेळी रंगली होती.त्या मुळे पक्षा कडुन पाटील यांच्या बंडखोरी कडे दुर्लक्ष करून सन्मानाची वागणूक दिली जात आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

मध्यंतरी च्या कालावधीत सावंत हे देखील पक्षा पासुन फारकत घेऊन होते मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सोलापूर धाराशीव जिल्ह्याची धुरा सावंताच्या खांद्यावर दिली आहे ,मध्यंतरी सोलापूर दौर्‍यावर आलेल्या सावंत यांच्या बैठकीस पाटील यांनी दांडी मारली असली तरी स्वतः सावंत यांचा फोन आल्यास जावु अशी भुमीका घेतली होती. या पार्श्वभूमीवर शिवाजीराव सावंत यांनी माजी आमदार नारायण पाटील यांची भेट घेऊन तानाजीराव सावंत व नारायण पाटील यांच्यातील गैरसमज दुर करुण आगामी काळात पक्षवाढीसाठी एकत्र काम करण्याचे संकेत दिले असल्याची चर्चा आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवलेल्या रश्मी बागल या देखील शिवसेना असल्याने आगामी जिल्हापरिषद पंचायत समिती व नगरपालींकाच्या निवडणुकीत शिवसेनेचा कौल कुणाला असणार? बागल व पाटील यांना एकत्र आणून स्थानिक निवडणुकी जिंकण्यासाठी सावंत बंधु प्रयत्न करणार का? आशा चर्चा सुरु झाल्या आहेत

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts